भगुर –: झेप फाऊंडेशन, महाराष्ट्र शासन – आपत्ती व्यवस्थापन विभाग व जिल्हा परिषद नाशिक जिल्हा यांचे संयुक्त विद्यमाने व राष्ट्रवादी महिला काँग्रेस नाशिक जिल्हाध्यक्षा सौ. प्रेरणा बलकवडे यांचे प्रयत्नातुन उभारलेले बलकवडे कोविड केअर सेंटरचे उद्घाटन आज साधारण व ऑनलाईन पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नाशिक जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, तालुकाध्यक्ष राजाराम धनवटे व विधानसभाध्यक्ष सोमनाथ बोराडे यांचे हस्ते संपन्न झाले.
गेल्या १ वर्षा पेक्षा जास्त दिवसांहून अधिक काळ होऊन गेल्यानंतर कोरोना सारख्या भयंकर आजाराने लोक पुन्हा त्रस्त व्हायले लागले आहेत. यातच कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच असून कोरोना झाल्यानंतर कुटुंबियांपासुन विलगीकरणात राहणे कठीण होत आहे. भगुर शहराची लोकसंख्या वीस हजार असून भगुर नगरपालिकेचा दवाखाना आहे. मात्र त्यात पुरेशा सुविधा नाहीत. नागरिकांना खाजगी दवाखान्यात उपचार घेणे आर्थीकदृष्ट्या परवडत नसल्याने अनेक कोरोनाग्रस्त रुग्ण देवळाली कॅन्टोनमेंट तसचे महापालिकेच्या बिटको रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यात अनेकांना बेड उपलब्ध नाहीत. अनेक रुग्ण घरीच राहून उपचार घेत आहेत. यातील अनेक कोरोनाग्रस्त भगुरला सार्वजनिक ठिकाणी फिरतांना दिसतात. त्यातून शहरात रुग्ण वाढण्याचा धोका असल्यामुळे हे कोविड सेंटर सुरु केल्याचे कार्यक्रमात सांगण्यात आले.
यावेळी मध्यमवर्गीय व गरिबीत असलेल्या रुग्णांना हाॅस्पिटल मध्ये गर्दी अभावी बेड मिळत नसल्याचे लक्षात घेवुन सौ. बलकवडे व त्याच्या कुटुंबियांनी बलकवडे क्रिडा संकुल येथे ५० बेडचे कोविड सेंटर उभारण्याचा विचार केला व समाजहिताचे काम म्हणुन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून लागलीच मान्यता देखील मिळवली. ॲड गोरखनाथ बलकवडे यांच्या मार्गदर्शनाने आज सुसज्ज असे कोविड केअर सेंटर फेसबुक लाईव्ह द्वारे लोकार्पण होऊन, प्रत्यक्षात रुग्णांच्या सेवेसाठी खुले देखील झाले. उपचारासाठी डॉ.पवन चौहान, डॉ. निखिल देसले यांच्यासह ६ नर्सेस उपलब्ध असून प्राथमिक स्वरूपात लागणारी सर्व औषधांचा पुरवठा करण्यात आला आहे. या केंद्रासाठी अजुन २ डॅाक्टर लवकरच जोडले जाणार असल्याची माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्तविक सादर करत असताना सौ. प्रेरणा बलकवडे यांनी हे कोविड सेंटर लक्षणं नसणा-या मात्र कोविड पॅासिटीव्ह रुग्णासाठीचे असून या बलकवडे कोविड केअर सेंटरची पुर्ण रचना व व्यवस्था समजावुन दिली, यात त्यांनी मनोरंजनाची सुविधा, रुग्णांना विरंगुळा म्हणुन ठेवलेले बैठे खेळ जेवण इ. सर्व गोष्टी फेसबुक लाईव्ह द्वारे जनतेसमोर ठेवल्या. या सेंटर वर रुगणांना सर्व सुविधा मोफत दिल्या जाणार आहेत.
सदरचे कोविड केअर सेटर उभारत असताना भगुर वासियांची साथ व वैद्यकिय सेवा पुरविणारे डाॅक्टर व इतर कर्मचार्यांची साथ मिळाल्याने ही जनतेची सेवा लवकरात लवकर करण्यास आम्ही सज्ज झाल्याचे सौ. बलकवडे यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमास प्रत्यक्षात राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष कोंडाजी अव्हाड, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, तालुकाध्यक्ष राजाराम धनवटे, विशाल बलकवडे, जेष्ठ नागरीक संघटनेचे आध्यक्ष दादासाहेब देशमुख, जि. प नोडल ॲाफीसर कृष्णा बाविसकर, डॅा पवन चव्हान, डॅा संजय जाधव, आसाराम शिंदे, मुन्ना अनसारी, महेंद्र काळे, मयुर चव्हान, ओम रहाने व असंख्य भगुर शहरातील नागरीक फेसबुक लाईव्ह द्वारे उपस्थित होते.