धुळे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला ३८ जागा तर विधानसभेच्या निवडणुकीत १८० जागा मिळतील असा विश्वास काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी धुळ्यात प्रसारमाध्यमांशी बोलतांना व्यक्त केला. ते धुळे येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी मतदारांचा मेळाव्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या अयोध्या दौ-याबाबत आपले मत मांडले. जेव्हा कुटुंबातील सर्व परिस्थिती चांगली असते तेव्हा देवदर्शनाला जावे. एकीकडे गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान होत अशावेळी मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अयोध्येचा दौरा करत असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांकडे पाठ फिरवल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ईव्हीएम मशीनवर माझा विश्वास असल्याचे वक्तव्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले कुणी काय बोलावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. जेव्हा निवडणुकीचा निकाल समोर येतो तेव्हा ईव्हीएम मशीनबाबत संशय निर्माण होतो असेही ते म्हणाले.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1644916967214829569?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1644917057966997504?s=20