मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पोलिस महासंचालकांना एक पत्र लिहले आहे. त्यात निर्देश दिले आहेत की, बकरी ईदच्या दिवशी म्हणजेच १० जुलै रोजी गायींची कत्तल होणार नाही याची काळजी घ्यावी. नार्वेकर हे नुकतेच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये विधानसभा अध्यक्ष झाले आहेत.
महाराष्ट्रात गो हत्या हा गुन्हा आहे. त्यावर भाजप-शिवसेना सरकारने बंदी घातली होती. गाईचे मांस विकणाऱ्या आणि बाळगणाऱ्याला पाच वर्षांपर्यंतच्या कारावासाची आणि दहा हजारांपर्यंतच्या दंडाची शिक्षा होऊ शकते. मात्र, स्थानिक प्रशासनाकडून ‘फिट टू स्लॅटर’ प्रमाणपत्र मिळवून वासरे आणि गायींची कत्तल केली जाते.
नार्वेकर यांनी पोलिस महासंचालकांना पत्र दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रात गाईच्या हत्येला परवानगी नाही. बकरी ईदच्या दिवशी गाईचा बळी दिला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात कुठेही गाईची कत्तल होणार नाही, याची पूर्णपणे काळजी घ्यावी. या पत्राची दखल घेत पोलिस महासंचालकांनी राज्यातील सर्व पोलिस अधिकाऱ्यांना यासंदर्भातील निर्देश दिले आहेत.
तत्पूर्वी, लोकसभा खासदार आणि ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (AIUDF) प्रमुख मौलाना बदरुद्दीन अजमल यांनी आसाममधील मुस्लिमांना हिंदूंच्या भावनांचा आदर करण्याचे आवाहन केले आहे. ईद-उल-अधाच्या काळात गायींची कुर्बानी देऊ नका, असे आवाहन त्यांनी केले आहे. अजमल हे देवबंदी स्कूल ऑफ थिंकिंगशी संलग्न इस्लामिक विद्वानांच्या प्रमुख संघटनांची सर्वोच्च संस्था असम राज्य जमियत उलामा (ASJU) चे अध्यक्ष देखील आहेत.
Bakri Ed Assembly Speaker Rahul Narvekar Letter to DGM Cow Slaughter