मुंबईत काँग्रेसच्या आंदोलनात बैलगाडीवर क्षमतेपेक्षा जास्त कार्यकर्ते बसल्यामुळे काय झालेमुंबई – काँग्रेसतर्फे अंटोप हिलमध्ये इंधन दरवाढ आणि महागाई विरोधात बैलगाडीवर क्षमतेपेक्षा जास्त कार्यकर्ते बसल्यामुळे ती मोडली. त्यामुळे कार्यकर्त्यांची चांगलीच फजिती झाली. सुदैवाने कोणाला दुखापत झाली नाही. पण, या आंदोलनामुळे भाजपला चांगला मुद्दा मिळाला. त्यांनी सोशल मीडियामधून आंदोलनाची चांगलीच खिल्ली उडवली. या बैलगाडीवर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप होते. या आंदोलनात बैलगाडीचे नुकसान झाले आहे. बैलांनाही जखम झाल्याचे बोलले जात आहे.
भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी ट्विट करत एक पोस्ट टाकली असून त्यात गाढवांचा’ भार उचलायला, ‘बैलांचा’ नकार! असे म्हटले आहे. तर इतर नेत्यांनी अशा पध्दतीने काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
'गाढवांचा' भार उचलायला, 'बैलांचा' नकार!
मा. @BhaiJagtap1 तुम्हाला सांगू इच्छितो की, "माणसाने झेपेल तेवढंचं करावं!"
असे पब्लिसिटी स्टंट करताना, त्या मुक्या जीवांचा विचार करावा! pic.twitter.com/dbceBpX6J5— Prasad Lad (Modi ka Parivar) (@PrasadLadInd) July 10, 2021