किरण घायदार, नाशिक
फलक रेखाटनातून कलाशिक्षक देव हिरे यांनी बैलपोळा सणाच्या शुभेच्छा दिल्या. या फलरेखाटनात इडा पिडा टळू दे, बळीराजाचे राज्य येऊ दे…! असे सांगत हिरे यांनी शेतक-यांची दौलत असे म्हटले आहे.
हिरे म्हणाले की, आपल्या भारतीय कृषिप्रधान संस्कृतीतील हजारो वर्षांपासून शेतात शेतकऱ्यांसाठी राब-राब राबणाऱ्या बैलाचा सण म्हणजे बैलपोळा. जगाचा पोशिंदा शेतकऱ्याचा खरा सारथी,मित्र,सखा,सोबती, इमानदार सहकारी म्हणजे त्याचा सर्जा-राजा. हीच शेतकऱ्यांची खरी दौलत.
आजच्या या सणाच्या दिवशी सर्व शेतकरी बांधव आपल्या लाडक्या बैलांना अंघोळ घालतात, झुल,घंटी,घुंगरू,फुलमाळा, फुगे,रंगांनी नटवून सजवून पुरणपोळीचा गोड नैवद्य खाऊ घालून त्याच्या चरणी नतमस्तक होऊन कृतज्ञता व्यक्त करतात आणि पुन्हा पुढील वर्षभर आपल्या बैलाच्या साथीने कष्ट करून शेतात सोनं उगवण्याची हिम्मत व प्रेरणा घेऊन अभिमानानं वाटचाल करतात.