इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – चित्रपट सृष्टीतील कलाकारांना कोणत्याही स्वतंत्र ओळखीची गरज नसतेच. त्यांच्या व्यवसायामुळे त्यांची सगळ्यांना माहिती असते. इतकेच काय पण त्यांचे वैयक्तिक आयुष्य देखील चर्चेत असते. त्यामुळेच कोणाचे अफेअर सुरू आहे, कोण कोणाचा जोडीदार आहे, अशा सगळ्या गोष्टींची इत्थंभूत माहिती चाहत्यांना असते. अशाच एका वैयक्तिक कारणामुळे अभिनेत्री राम्या कृष्णन चर्चेत आहे.
‘बाहुबली’ फेम अभिनेत्री राम्या कृष्णन ९० च्या दशकापासून चाहत्याचं मनोरंजन करत आहे. पण राम्या केवळ तिच्या सिनेमांमुळेच नाही तर तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. राम्याचे एका विवाहित पुरुषासोबत प्रेमसंबंध होते. इतकेच नव्हे तर त्याच्यापासून ती प्रेग्नन्ट देखील होती. तीन दशकांपासून सिनेविश्वावर राज्य करणाऱ्या राम्या कृष्णन हिने अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. असे असले तरी तिला खरी ओळख ‘कांटे कूथुर्ने कानू’, पदयाप्पा आणि ‘बाहुबली’ या चित्रपटातून मिळाली.
राम्या कृष्णन आणि दिग्दर्शक एस.रविकुमार यांच्या अफेअरबाबत फार कमी लोकांना माहिती आहे. राम्या कृष्णन आणि के.एस. रविकुमार यांनी एकत्र अनेक सिनेमांमध्ये काम केलं. ‘पदयप्पा’ आणि ‘पत्तली’ हे चित्रपट हिट झाल्यानंतर २००२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पंचतंत्र’ सिनेमात रवी कुमार यांनी राम्याला एक वेगळीच भूमिका दिली होती. अनेक चित्रपटात सोबत काम केल्याने, हे दोघेही परस्परांच्या प्रेमात पडले. मात्र, तेव्हा रविकुमार विवाहित होते.
मिळालेल्या माहितीनुसार, हे दोघे अनेक वर्ष एकमेकांना डेट करत होते. पण दिग्दर्शक रवी कुमार यांच्या पत्नीला या अफेअरबद्दल कळल्यानंतर तिने राम्याला त्यांच्यापासून लांब राहण्यास बजावले. याच दरम्यान राम्या प्रेग्नंट असल्याची चर्चा सुरू झाली. त्यानंतर रवीकुमार आणि त्यांच्या पत्नीमध्ये वाद सुरू झाले. विशेष म्हणजे, राम्या गरोदर असल्याच्या चर्चा सुरू झाल्यानंतर रवीकुमार यांनी तिच्यासोबत असलेले नाते संपवण्याचा निर्णय घेतला. आणि हे नातं संपवण्याचा निर्णय घेणे रवीकुमार यांना महागात पडल्याचे कळते. कारण रिपोर्टनुसार, राम्याने रवीकुमार यांच्याकडून अबॉर्शनसाठी तब्बल ७५ लाख रुपये मागितल्याची चर्चा तुफान रंगली. या सगळ्या गोष्टींबाबत अभिनेत्री राम्या हिला रविकुमार यांच्यासोबतच्या नात्याबद्दल विचारणा करण्यात आली. तेव्हा या निव्वळ अफवा असल्याचे तिने सांगितले. रवीकुमार प्रकरणानंतर अभिनेत्री राम्या आणि निर्माते कृष्णा वामसी यांनी २००३ मध्ये लग्न केलं. १२ जून २००३ रोजी त्यांचं लग्न झालं. तिला रित्विक नावाचा एक गोड मुलगा देखील आहे.