बागलाण (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील डांगसौंदाणे नगरी विकासाचे रोल मॉडेल ठरले आहे. शहरा प्रमाणे गावाची होणारी विकासात्मक वाटचाल ही ग्रामीण विकासाची नांदी ठरेल असे गौरवोद्गार बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी काढलेत..
आमदार बोरसे यांच्या हस्ते गावातील विविध विकासकामांचे उदघाटन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाजार समितीचे संचालक संजय सोनवणे हे होते.
पश्चिम आदिवासी भागातील डांगसौंदाणे नगरी राजकीय, सामाजिक दृष्ट्या पुढारलेली असुन गावाचा विकासाचा आलेख कायम उंचावत आहे. यासाठी विकासाची दूरदृष्टी असलेले नेतृत्व गावाला लाभले असुन बाजार समितीचे संचालक व ग्रामपंचायतीच्या सत्ताधारी गटाचे प्रमुख असलेले संजय सोनवणे हे खऱ्या अर्थाने विकासपुरुष आहेत. सतत मुबंई नाशिक जाऊन मिळेल त्या योजनेतून निधी आणण्याचे कसब त्यांच्यात आहे. सतत लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्या संपर्कात राहुन गावाविकसाठी निधीची तरतूद कशी करता येईल यासाठी संजय सोनवणे कायम प्रयत्नशील राहत असल्या मुळेच गावाचा चौफेर विकास साधला गेला असल्याचे आमदार बोरसे यांनी सांगितले.
ग्रामपंचायतीने उभारलेल्या भव्य व्यापारी संकुलासह गावाच्या विविध भागात उभारलेल्या शिल्प प्रतिकृतींचे उदघाटन आमदार बोरसे यांनी केले यामध्ये प्रामुख्याने गावतातील बसस्थानक परिसरात उभारलेले बैलजोडी व शेतकरी, गाय वासरू, हत्ती, हरण, दीपस्तंभ, मेक इन इंडिया चे प्रतीक असलेला सिह आदी शिल्प प्रतिकृतींचे उदघाटन आमदार बोरसे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी श्रीराम मंदिरात आमदार बोरसे यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास सरपंच जीजबाई पवार, माजी जिप सदस्य सिंधुताई सोनवणे, उपसरपंच सुशीलकुमार सोनवणे, ग्राप सदस्य विजय सोनवणे, वैशाली बधान,यशोदा सोनवणे, लताबाई वाघ, रामचंद्र पवार, वत्सला पवार, मुरलीधर मुसळे,साहेबराव काकुळते, बापु देवमन सोनवणे, पंकज बधान, रवींद्र सोनवणे, नंदू बैरागी गोविंद चिंचोरे, काशिनाथ सुलक्षण,अशोक गौतम, जगदीश बोरसे सोनवणे,सुरेश अहिरे संजय नेरकर, मनोज बधान ग्रामसेवक अशोक चव्हाण आदी उपस्थित होते.
ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात?
तर मग इंडिया दर्पणच्या दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा
https://chat.whatsapp.com/