बागलाण – नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ नाशिक संलग्न बागलाण तालुका मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी “इंडिया दर्पण”चे निलेश गौतम यांची निवड करण्यात आली आहे. तर, कार्याध्यक्षपदी “दै.सकाळ” चे दीपक खैरनार तर सरचिटणीसपदी “दै. लोकमत”चे संजय जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
सटाणा येथील शासकीय विश्रामगृह येथे नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या बागलाण शाखेची द्विवार्षिक निवडणूक आज दि.१५ रोजी बिनविरोध पार पडली.जिल्हा मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष यशवंत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब बोरगुडे यांनी कामकाज पाहिले. यावेळी जिल्हा सरचिटणीस रमेश देसले,जिल्हा पदाधिकारी काशिनाथ हांडे व जिल्हा समन्वयक बाजीराव नाना खैरनार उपस्थित होते. रमेश देसले यांनी स्वागत व बैठकीचे सुत्रसंचलन केले.यावेळी झालेल्या निवडणूकीत बागलाण तालुका मराठी पत्रकार संघाची बिनविरोध निवडून आलेली नुतन कार्यकारणी घोषित करण्यात आली.
सर्वांची निवड घोषित झाल्यानंतर संस्थापक-जिल्हाध्यक्ष यशवंत पवार,जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब बोरगुडे यांचे हस्ते नवनिर्वाचित पदाधिका-यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी १५ जागांसाठी १५ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निवडणुक बिनविरोध झाली. यावेळी सतिश कापडणीस,शशिकांत बिरारी,तुळशीदास सावकार,दिनेश सोनवणे,अशोक गायकवाड. एकनाथ आहीरे आदींसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवड करण्यात आलेली कार्यकारिणी अशी
तालुकाध्यक्ष: निलेश गौतम
कार्याध्यक्ष: दीपक खैरनार, उपाध्यक्ष: सुनील खैरनार व नंदकिशोर शेवाळे,
सरचिटणीस: संजय जाधव,
सहसरचिटणीस: योगेश वाणी,
खजिनदार: रोशन भामरे,
सहखजिनदार: तुषार रौंदळ,
संघटक: भास्कर बच्छाव,
सहसंघटक: एकनाथ अहिरे,
समन्वयक: प्रा.किरण देशमुख,
कार्यकारिणी सदस्य : भुषण पगारे,जगन जाधव,अभिमान अहिरे व साहेबराव काकुळते आदि निवडून आले आहेत.