सटाणा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बागलाण तालुक्यातील जायखेडा येथे थेट सरपंचपदाच्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत शाळेत पोषण आहार बनवणारी सर्वसामान्य गृहिणीचा विजय झाला आहे. या विजयानंतर गावक-यांनी मोठ्या जल्लोषात त्यांची विजयी मिरवणूक काढली. जायखेडा येथील सरपंचपद हे अनूसूचित जमातीसाठी राखीव असल्याने या जागेसाठी पाच उमेदवार आपले नशिब अजमावत होते. जायखेडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत पोषण आहार बनवणा-या शोभा गायकवाड यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे त्यांना मतदारांनी भरघोस मतदान केले. या निवडणुकीत त्यांनी १६६२ मते मिळवत हा विजय मिळवला. कोणत्याही निवडणुकीत पैसे खर्च करावे लागते. पण, या निवडणुकीत तरी केवळ स्वभाव व त्याच्या कामामुळे त्यांना हा विजय मिळाला. त्यामुळे येथील निवडणूक चर्चची ठरली.