सटाणा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बागलाण पंचायत समितीच्या १६ गणासाठी आज आरक्षण सोडत पंचायत समितीच्या भिकन जयाजी सभागृहात संपन्न झाली. प्रांत अधिकारी बबन काकडे, तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील, गटविकास अधिकारी पांडुरंग कोल्हे यांच्या उपस्थितीत ही सोडत जाहीर करण्यात आली. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार झालेल्या आरक्षण सोडतीत अनेक इच्छुकांना धोबीपछाड मिळाली तर काही गणांचे अनपेक्षित रित्या आरक्षण पडल्याने काहींच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. बागलाण तालुक्यात नव्या रचनेनुसार एकूण 8 जिल्हा परिषद गट असुन 16 पंचायत समिती गण आहेत .आज झालेल्या आरक्षण सोडतीत खालील प्रमाणे आरक्षण जाहीर झाले आहे.
Baglan Panchayat Samiti Ward wise Reservation Draw Satana