सटाणा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सध्या लग्नसराईचा मोसम जोरात सुरू आहे. परंपरेप्रमाणे विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन यावेळी करण्यात येते. मात्र, बदलत्या काळानुसार, या परंपरांमध्ये बदलही केला जात आहे. सध्या तालुक्यातील एका लग्नाची जोरदार चर्चा आहे.
पश्चिम आदिवासी पट्ट्यात लग्नसोहळे सध्या धुमधडाक्यात सुरू आहेत. या सोहळ्यात नवरदेवाची मिरवणूक हे विशेष उत्साहाचे असते. लग्न सोहळ्याला जाण्यासाठी दोघा नवरदेवांनी चक्क बैलगाडीतून मिरवणूक काढली. सर्वसाधारणपणे घोड्यावर किंवा बग्गीवर निघणारी मिरवणूक थेट बैलगाडीवर निघाली त्यामुळे ती विशेष आकर्षणाची आणि चर्चेची ठरली. तसेच, सध्या खान्देशी गाणे झुमका वाली पोर याचा सर्वत्र बोलबाला आहे. आणि नवरदेवाच्या मिरवणुकीत याच गाण्यावर सर्वांनी ठेका धरला. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतो आहे.
Baglan Navardev Miravnuk Bailgadi Video