इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बागेश्वरबाबा म्हणजेच धीरेंद्र शास्त्री हे मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध धार्मिक तीर्थक्षेत्र बागेश्वर धामचे पीठाधीश्वर आणि पुजारी आहेत. त्यांच्या निवासस्थानी, देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक भाविक त्यांच्या दर्शनासाठी येतात आणि आपल्या समस्या मांडतात. त्यामुळे बागेश्वर बाबा देशभरात चर्चेत आहेत, त्यांच्या प्रवचनाने अनेक जण प्रभावित होतात, एक मुस्लिम युवती देखील त्यांच्या प्रवचनाने प्रभावित होऊन हिंदू बनली आणि तिने आपल्या प्रियकराशी लग्न गाठ बांधली आहे.
हिंदू धर्म स्वीकारण्याचे ठरविले
अनेक भाविक आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी खातू श्यामजींच्या दर्शनाला जातात, त्यांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून मोठ्या संख्येने लोक दररोज येतात. पंडित धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांचे प्रवचन ऐकून मुजफ्फरपूरची नौशिन परवीन उर्फ रुखसानाची आता रुक्मिणी बनली आहे. हिंदू प्रथा परंपरेने तिने तिच्या प्रियकरासोबत लग्न केले. तिचा प्रियकर रोशन कुंवर हा बिहारच्या वैशाली येथील राहणारा आहे.
सुमारे ४ वर्षापासून दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरू आहेत. बागेश्वर बाबाचे प्रवचन ऐकून मुलीने हिंदू धर्म स्वीकारण्याचे ठरवले. आता रुक्मिणी म्हणाली की, मी बागेश्वार बाबांच्या दरबारात यायचे. त्याठिकाणी त्यांचे प्रवचन ऐकत होती. त्यावेळी मी इस्लाम धर्मात होते. मात्र आता सनातन धर्म स्वीकारून मी लग्न करण्याचा ठरवले. त्यानंतर वैशाली येथील गंडक नदीत डुबकी मारून तिचे प्रथेनुसार हिंदू धर्म स्वीकारला, त्यानंतर रोशनसोबत जात मंदिरात लग्न केले.
अशी झाली प्रेमाला सुरुवात
खरे म्हणजे रोशन आणि रुक्मिणी या दोघांमधील प्रेम जयपूरच्या कॉलेजपासून सुरू झाले. कॉलेजमध्ये असताना रोशनची ओळख मुजफ्फरपूरच्या रुखसाना अन्सारीसोबत झाली. हे दोघेही बिहारचे होते. भाषा एकच असल्याने आणि दुसऱ्या राज्यात आल्याने पाहता पाहता दोघेही एकमेकांच्या जवळ आले. दोघांचे प्रेम प्रकरण सुरू झाल्याने अखेर दोघांना एकमेकांशी लग्न करायचे होते, परंतु घरचे तयार नव्हते.
एकेदिवशी दोघेही बागेश्वर धामच्या बाबाच्या दरबारात गेले. रुखसाना पंडीत धीरेंद्र शास्त्रींचे प्रवचन ऐकून प्रभावित झाली. त्यानंतर तिने सनातन धर्म स्वीकारण्याचे ठरवले. त्यानंतर सर्वात आधी रुखसानाने हिंदू प्रथा परंपरेनुसार धर्म परिवर्तन करत स्वत:चे नाव रुक्मिणी ठेवले. तसेच गंडक नदीत काही विधी पार पडले. मग रोशन आणि रुक्मिणीने मंदिरात जाऊन लग्न केले. हिंदू प्रथेनुसार या दोघांचे लग्न झाले असून दोघांनी एकमेकांसोबत आयुष्य जगण्याचे वचन दिले आहे. यावेळी अनेकांनी या लग्नाला उपस्थिती लावली होती.
Bageshwar Baba Young Girl Religious Transformation