निलेश गौतम, सटाणा
बागलाण विधानसभा मतदारसंघाचा निकाल एकतर्फी लागला आहे, भाजपचे उमेदवार दिलीप बोरसे यांनी तब्बल १ लाख २९ हजार ६३८ इतके प्रचंड मताधिक्य मिळवत विजय प्राप्त केला आहे. बोरसे यांनी प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदपावर गट) दीपिका चव्हाण यांचा दारुण पराभव केला असून त्यांना ३० हजार ३४५ इतकी मते पडली आहेत. त्यांची अनमात जप्त झाली असून बागलाण विधानसभा निवडणूक लढविणारे इतर १५ उमेदवारांचे ही डिपॉझिट जप्त झाले आहे.
सुरुवातीला अटीतटीची वाटणारी लढत शेवटी बोरसे यांच्या बाजूने एकतर्फी झाली. या निकालाने जनतेचा विकासकामांवर विश्वास असल्याचे स्पष्ट झाले आहे. २३०० कोटींच्या विकास निधीमुळे मतदारसंघात जनतेचा विश्वास जिंकलेल्या दिलीप बोरसे यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला. दिलीप बोरसे हे तिसऱ्यांदा आमदार झाले असून, त्यांच्या कुटुंबातील लहान बंधू उमाजी बोरसे २००९ ला भाजपा कडून आमदार राहिले आहेत. त्यामुळे बोरसे घराण्यात चौथ्यांदा आमदारकीचा मान मिळाला आहे.
- दिलीप बोरसे (भाजप) १ लाख ५९ हजार ६८१ विजयी उमेदवार
- दीपिका चव्हाण (राष्ट्रवादी शरद पावर गट) ३० हजार ३८४ पराभूत
- प्रहार जनशक्तीच्या जयश्री गरुड यांना ४ हजार ४१३ इतकी मते पडली