इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
विधानसभा निवडणुकीसाठी नामनिर्देश पत्र छाननी नंतर आता वैध उमेदवारांची यादी फोटोसह प्रसिध्द करण्यात आली आहे. बागलाण विधानसभा मतदार संघात एकुण २६ उमेदवार आता रिंगणात असून त्यात भाजपचे विद्यमान दिलीप मंगळू बोरसे व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे दिपीका चव्हाण हे प्रमुख उमेदवार आहे. त्याव्यतिरिक्त इतर राजकीय पक्ष व उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे.