नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यातील बागलाणच्या कंधाणे व परिसरात शुक्रवारी वादळी वा-यासह मुसळधार पावसाने मका पिक भुईसपाट झाले. ऐन दाणा भरणीच्या वेळेस पिके आडवी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून गेल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. सततच्या पावसामुळे ओला दुष्काळ जाहीर व पिक विमा मंजूर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे..