अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
बागलाण तालूक्यातील बिजोरसे येथे एका माथेफिरूने शेतातील कपाशीचे फिक उपटून फेकल्याची घटना घडली आहे. अल्पभूधारक शेतकरी प्रल्हाद कोर यांच्या शेतात हा प्रकार घडला. कोर यांनी आपल्या शेतात ठिबक संचाचा वापर करीत कपाशीची लागवड केली होती. लागवडीनंतर कपाशीला फुलोरा आणि कैरी येत असतानाच अज्ञात माथेफिरुने हिरवीगार कपाशी उपटून फेकल्याचे कोर कुटूंबियांच्या लक्षात आले. विशेष म्हणजे या माथेफिरुने रात्रीतून हे सगळ कृत्यू केले. यावेळी त्याने शेतातील घराचा विद्युत पुरवठा सुध्दा खंडीत केला. त्यानंतर शेतातील सर्व पिक उध्वस्त केले. सकाळी हा सर्व प्रकार लक्षात येताच कोर कुटूंबाला धक्का बसला, मोठ्या आर्थिक परिस्थितीचा सामना करत दिवस रात्र मेहनत करत येणारे पिक हातचे गेल्याने कोर कुटूंबाला मोठा मानसिक धक्का बसला आहे. याप्रकरणी जायखेडा पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.