अजय सोनवणे
नाशिक जिल्हयाच्या बागलाण तालूक्यातील साल्हेर किल्ला आणि सलोटा किल्ल्यावरील गवतांना आग लागल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली.सध्या किल्ल्यावरील गवत वाळलेले असल्याने आगीच्या वणव्याने रौद्ररुप धारण केले. या परिसात औषधी वनस्पती त्याच बरोबर वन्यजीव मोठ्या संख्येने असल्याने आग विझविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असतांना तसा प्रयत्न झाल्याचे दिसून आले नाही. त्यातच आग ही खूप उंचीवर असल्याने आग विझविण्याचे प्रयत्न तोकडे पडतांना दिसून आले. सकाळपासून लागलेल्या आगीचा वणवा रात्रीच्या सुमारास सुध्दा सुरु असल्याच दिसून आले. त्यामुळे या किल्ल्यावरील असलेली औषधी वनस्पती आणि वन्यपक्षी यांना मोठी हानी झाल्याची भीती दुर्गप्रेमीनी व्यक्त केली.