अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
नाशिक जिल्हयातील जिल्हयातील बागलाण कतालूक्यातील पश्चिम पट्ट्यातील श्रीपूरवडे गावाच्या परिसरात ढगफुटी सदृष्य पावसाने संध्याकाळच्या सुमारास हजेरी लावली. या पावसामुळे भिमाशंकर परिसरातून नाल्याच पाणी श्रीपूरवडे गावात घुसले. त्यामुळे गावात जणू पूर आल्याचे चित्र होते. या पावसामुळे द्राक्ष, डाळींब बागांच्या शेतात मोठे तळे साचले व शेतातील माती वाहून गेले. या पावसामुळे सोयाबीन, मका या पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. नदी ओढे यांना पूर आल्याने त्याचे पाणी रस्त्यावर आल्याने नामपूर- ता-हाबाद, नामपूर-साक्री, नामपूर-मालेगाव कडे जाणारे रस्ते पाण्याखाली आल्याने काही काळासाठी या मार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती.