इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – जवळपास दहा वर्षांपूर्वी केदारनाथमध्ये आलेल्या प्रलयाने मोठी वाताहत झाली. हा प्रलय इतका भयंकर होता की, त्याच्या धक्क्यातून फक्त केदारनाथवासीच नाही, तर संपूर्ण जग अद्याप सावरू शकलेलं नाही. निसर्गानं दिलेला हा धक्का इतका जबर होता की आजही पावसाचा जोर वाढल्यावर येथील लोक घाबरून जातात. त्यावेळी संकटाची चाहूल कुणालाही लागली नव्हती. पण बद्रीनाथमध्ये आतापासूनच संकटाचे संकेत मिळाले आहेत.
चारधामपैकी एक असलेल्या बद्रीनाथचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाणारे जोशीमठ गाव भूस्खलनाच्या विळख्यात अडकले आहे. सध्या जवळपास सहाशे गावांना तडे गेले असून लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची तयारी सुरू झाली आहे. जोशीमठ येथील घरांनाच नव्हे तर रस्त्यांना देखील तडे जाऊ लागले आहेत. दोन दिवसांपासून ही समस्या जास्त प्रमाणात जाणवू लागल्याने आतापर्यंत १०० कुटुंबांना सुरक्षित जागी हलविले आहे. अनेकांना थंडीतच रात्र काढावी लागत आहे. मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी या संपूर्ण घटनाक्रमावर लक्ष ठेवून असले तरही स्थानिक नागरिकांनी प्रशासन लक्ष देत नसल्याचा आरोप केला आहे. काहींनी त्याविरोधात निदर्शनेही दिली.
https://twitter.com/navalkant/status/1610943120136605696?s=20&t=SYNDnLxS_pO8IvTFWIhZ1Q
यामुळे होतेय भुस्खलन
मानवनिर्मित आणि नैसर्गिक घटनांमुळे भुस्खलन होत आहे, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. आणि मुख्य म्हणजे ही घटना पहिल्यांदा होत नसून कित्येक वर्षांपासून बद्रीनाथ भूस्खलनाचा सामना करीत आहे. तर जवळच सुरू असलेल्या नॅशनल थर्मल पॉवर प्रकल्पामुळे गावाला धोका निर्माण झाला असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
https://twitter.com/_prashantkadam/status/1611627356648771584?s=20&t=SYNDnLxS_pO8IvTFWIhZ1Q
म्हणून बद्रीनाथ असुरक्षित
बद्रीनाथ हे शंभर वर्षांपूर्वी भूकंपाच्या ढिगाऱ्यावर विकसित झालेले गाव आहे. अतिभूकंपप्रवण क्षेत्रांमध्ये बद्रीनाथचा समावेश पाचवा आहे. हवामानाचा परिणाम आणि पाणी झिरपत असल्यामुळेही भूस्खलन होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मुख्य म्हणजे १९७६ मध्येच याचा इशारा तज्ज्ञांनी दिला होता. गावातील जमीन अनेक ठिकाणी खचत चालली आहे. कारण सातत्याने नवनवे प्रकल्प आणि बांधकाम प्रकल्प यांचा परिणाम बद्रीनाथवर जास्त होत आहे.
https://twitter.com/TanushreePande/status/1611350582564114432?s=20&t=SYNDnLxS_pO8IvTFWIhZ1Q
Badrinath Joshimath Landslide Sinking Environment Ecology Geology
Uttarakhand