इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बदलापूर चिमुकल्या मुलींवरील अत्याचार प्रकरणातील फरार असलेले सहआरोपी शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल व सचिव तुषार आपटेला पोलिसांनी गजाआड केले आहे. १२ आणि १३ ऑगस्टला ही घटना घडल्यानंतर हे आरोपी फरार होते. या दोघांना कर्जत येथून ताब्यात घेण्यात आले आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटर नंतर विरोधकांनी या दोन्ही आरोपींवरुन विरोधकांवर निशाणा साधला होता. त्यानंतर दीड महिन्यांनी या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता. पण न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला होता. त्यानंतर ही अटक करण्यात आली आहे. आज त्यांना कोर्टात हजर केले जाणार आहे.
या प्रकरणात न्यायालयात एक याचिका करण्यात आली आहे. त्यामध्ये मानवी तस्करी आणि चाईल्ड पोर्नोग्राफीचे अनेक गोष्टी नमूद करण्यात आले आहेत. या संदर्भातीलही काही खुलासे पुढे येतील, अशी अपेक्षा शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केली आहे.