देवळाली कॅम्प – लॅम रोड वरील राजगृह सोसायटीतील विनय बदानी परिवाराने त्यांच्या आई वडिलांच्या इच्छेनुसार येथील केशर वाडी कांदा वाडी परिसरात पंधरा दिवसापूर्वी पाणपोईचे लोकार्पण केले होते. त्यानंतर सोमवारी नागरिकांना पोस्टीक आहार म्हणून ताकाचे विनामूल्य वाटप केले सदरच्या ताकाचे वाटप पुढील दोन महिने नागरिकांसाठी उपलब्ध करुन दिले जाणार आहे.
ताकाचे विनामूल्य वाटप उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी विनयभाई बदानी,सिद्धांत बदानी, निलेश पुरोहित,सुरेश कदम, पोपटराव जाधव, नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुधाकर गोडसे, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश टाकेकर, पत्रकार संजय निकम, प्रवीण आडके, गोकुळ लोखंडे, दीपक कणसे, प्रमोद मोजाड, रामदास मराठे, राजु इंगळे, अमोल तागड आदींसह नागरिक उपस्थित होते. कोविड या महामारी रोगाच्या काळात सुरक्षित अंतर ठेवत सर्वजण मास्कचा वापर करून उपस्थित होते.सर्व नियमांचे पालन करीत शुभारंभ कार्यक्रम संपन्न झाला,
प्रत्येकाने सामाजिक उपक्रम राबवावे
आपल्या परिवाराने मुंबईसह देवळालीच्या परिसरातही सामाजिक उपक्रम राबविले असून यापुढेही गोरगरिबांसाठी विविध उपक्रम सदैव राबविण्यात येणार आहे. जीवनामध्ये पाण्यासह दानधर्म करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येकाने आपल्या जीवनात सामाजिक उपक्रम राबवावे.
छाया बदानी