इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राज्य शासनाने सात आयएएस अधिका-यांचे बदल्याचे आदेश जाहीर केले आहे. दर आठवड्याला या बदल्यांचा धडका सुरु असून त्यात आता या अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्या आहे.
- श्री राजेंद्र निंबाळकर (IAS:SCS:2007) व्यवस्थापकीय संचालक, MSSIDC, मुंबई यांची व्यवस्थापकीय संचालक, सारथी, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- श्री संजय यादव (IAS:SCS:2009) जिल्हाधिकारी, मुंबई शहर, मुंबई यांची राज्य प्रकल्प संचालक, समग्र शिक्षा अभियान, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- डॉ. राजेंद्र भारुड (IAS:RR:2013) आयुक्त, TRTI, पुणे यांना प्रकल्प संचालक, RUSA, उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
- श्री दीपक कुमार मीना (IAS:RR:2013) अतिरिक्त आदिवासी आयुक्त, ठाणे यांची सहआयुक्त, राज्य कर, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- श्री समीर कुर्तकोटी (IAS:SCS:2013) यांची आयुक्त, TRTI, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- श्री महेश आव्हाड (IAS:SCS:2015) व्यवस्थापकीय संचालक, Haffkine Bio-pharma Corporation, Mumbai यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरण, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- श्री कीर्ती किरण पुजार (IAS:RR:2018) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी यांची जिल्हाधिकारी, धाराशिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.