इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मुलगी झाल्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी एका व्यक्तीने थोडीथोडकी नव्हे तर तब्बल १ लाख १ हजार पाणीपुरी मोफत वाटली. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियात व्हायरल झाला आहे. या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही अभिनंदन केले आहे.
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये पाणीपुरी विकणाऱ्या ३० वर्षीय व्यक्तीने आपल्या मुलीच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम केला. शहरातील नागरिकांना तब्बल एक लाख एक हजार पाणीपुरी मोफत खाऊ घालून आनंद व्यक्त केला. तसेच यानिमित्ताने अनोखा संदेशही दिला. मुलींना वाचवा आणि समाजात प्रबोधन व्हावे यासाठी हा उपक्रम विशेष चर्चेचा ठरला आहे. भोपाळच्या कोलार भागात गुप्ता पाणीपुरी भंडारच्या नावाने पथारी विकणारी आंचल गुप्ता यांनी वर्षभरापूर्वीच आपल्या मुलीच्या ‘अनोखी’च्या जन्मानिमित्त लोकांना ५० हजार पाणीपुरी मोफत खाऊ घातल्या होत्या. .
आपल्या मुलीच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त गुप्ता यांनी ‘बेटी है तो कल है’चा संदेश देऊन आनंद व्यक्त केला आणि दिवसभरात तब्बल १ लाख पाणीपुरी मोफत खाऊ घातल्या. यासाठी त्यांनी कोलार परिसरातील बंजारी मैदानात ५० मीटर लांबीच्या तंबूत २१ स्टॉल्स लावले आणि २५ मुलांना रोजंदारीवर नेमले होते. याद्वारे नागरिकांना पाणी पुरीचा आस्वाद घेता आला. कार्यक्रमस्थळी ‘बेटी वरदान है’, ‘बेटी बचाओ’, ‘बेटी पढाओ’चे बॅनर लावण्यात आले होते. तीन वर्षांचा मुलगा आणि एक वर्षाच्या मुलीचे वडील गुप्ता यांनी सांगितले की, ते पाणीपुरीची गाडी चालवून महिन्याला १५ ते २० हजार रुपये कमावतात.
दिला समाजाला संदेश
गुप्ता यांनी सांगितले की, ‘मुलीचा जन्म माझ्यासाठी स्वप्न पूर्ण झाल्यासारखे आहे. मला मुलगी हवी होती. गेल्या वर्षी माझ्या पत्नीने एका गोड मुलीला जन्म दिला. गेल्या वर्षी १७ ऑगस्टला देवाने मला आशीर्वाद म्हणून मुलगी दिली. पाणीपुरी खायला किती खर्च येतो या प्रश्नावर ते म्हणाले की, त्याचा हिशेब नाही. ‘गेल्या वर्षी मुलगी झाली तेव्हा ५० हजार पाणी पुरी मोफत दिले होते. पाणी पुरी देणे ही फार मोठी गोष्ट नाही. समाजाला फक्त बेटी वाचवण्याचा संदेश द्यायचा आहे.
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी गुप्ता यांची मुलगी ‘अनोखी’ हिला ट्विट करून शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणाले, ‘सदैव आनंदी आणि आनंदी राहा.’ गुप्ता यांनी सांगितले की, अनेकांनी त्यांच्या मुलीला भेटवस्तूही दिल्या. या कार्यक्रमाला क्षेत्राचे आमदार रामेश्वर शर्मा यांनीही हजेरी लावत गुप्ता दाम्पत्याने आयोजित केलेल्या अनोख्या कार्यक्रमाचे कौतुक केले.
https://twitter.com/ChouhanShivraj/status/1559909919939506177?s=20&t=FpG8najDvqQiXsDSkIm5Hg
Baby Girl Birth Family Distribute 1 lakh Pani Puri
Social Message Bhopal Madhya Pradesh Beti Bachao