अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप आमदार माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचे चिरंजीव प्रतापसिंह पाचपुते यांचा पराभव झाला. या निवडणुकीत बबनराव पाचपुते यांचे पुतणे साजन पाचपुते हे विजयी झाले. या पराभवाचा माजी मंत्री बबनराव पाचपुते यांना मोठा धक्का मनाला जात आहे. काष्टी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाचपुते कुटुंबात फूट पडल्याचे पाहायला मिळाली.
दरम्यान साजन पाचपुते यांनी सर्व काष्टी ग्रामस्थांचे आभार मानले आहेत. स्वर्गीय सदाशिव पाचपुते यांच्या निधनानंतर माझ्या आयुष्यातील ही पहिलीच निवडणूक होती, माझ्या विरोधात सर्व मोठे नेते एकत्र झाले होते, मात्र सर्वसामान्य जनता माझ्या पाठीशी उभी राहिली अशी भावना यावेळी साजन पाचपुते यांनी व्यक्त केली.याच जिल्ह्यात माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी ग्रामपंचायतीत भाजपचा विजय झाला. येथे मंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांचे वर्चस्व दिसून आले.
Grampanchayat Election EX Minister Babanrao Pachpute NCP BJP Politics