इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
माजी राज्यमंत्री, माजी आमदार बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आल्यानंतर हत्येची जबाबदारी बिश्नोई गँगने घेतली आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट करत ही जबाबदारी घेतली. या पोस्टचा अधिक तपास आता पोलिस घेत आहे. ही पोस्ट खरी आहे का. केवळ प्रसिध्दीसाठी ही पोस्ट केली आहे. याचा तपासही केला जात आहे. विशेष म्हणजे या पोस्टमध्ये विविध कारणे दिली आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी ताब्यात दोन आरोपींकडून मोठी माहिती पोलिसांना मिळाली आहे. या तिन्ही आरोपींनी एक खोली कुर्ल्यात घेतली होती. त्याचे १४ हजार रुपये भाडे ते देत होते. चार जणांनी मिळून बाबा सिध्दीकी यांच्या हत्येची सुपारी घेतली होती. हे आरोपी प्रत्येकी ५० हजार रुपये वाटून घेणार होते.
२ सप्टेंबर ते १२ ऑक्टोंबर दरम्यान या आरोपींनी बाबा सिद्दीकी यांच्या घराची आणि कार्यालयाची रेकी केली. बाबा सिद्दीकींच्या प्रत्येक हालचालीवर त्यांचे लक्ष होते. पंजाबमध्ये हे आरोपी तुरुंगात भेटले. एकमेकांच्या संपर्कात आल्यानंतर तिथे आधापासून बिश्नोई गँगचा एका आरोपी होता. त्यांच्या संपर्कात हे तिघे आरोपी आले. तेव्हा बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा कट रचण्यात आला. शिवा नावाचा तिसरा आरोपी सध्या फरार असून त्यांचा पोलिस शोध घेत आहे.