इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – योगगुरू बाबा रामदेव यांच्या मालकीच्या रुची सोया या कंपनीच्या शेअरधारकांसाठी अत्यंत महत्त्वाचे वृत्त आहे. कारण बाबा रामदेव यांनी आज एक मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार, रुची सोयाच्या शेअर धारकांना आता मोठा लाभांश मिळणार आहे.
योगगुरू रामदेव यांच्या रुची सोया कंपनीने मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात प्रचंड झेप घेतली आहे. तिमाही निकाल पाहता कंपनीने गुंतवणूकदारांमध्ये लाभांश वितरणाची घोषणा केली आहे. रुची सोयाने आर्थिक वर्ष 2022 साठी 250% च्या बंपर लाभांशाची घोषणा केली आहे. जर आपण शेअरबद्दल बोललो, तर प्रति शेअर 5 रुपये लाभांश देण्याची योजना आहे, ज्याचे दर्शनी मूल्य 2 रुपये आहे. रुची सोयाने दिलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा लाभांश आहे. 2008 मध्ये कंपनीने 25% लाभांश देण्याची घोषणा केली होती. 2019 मध्ये योगगुरू रामदेव यांनी दिवाळखोर कंपनी रुची सोयाचे अधिग्रहण केले होते.
रुची सोयाने आर्थिक वर्ष 2022 मध्ये प्रचंड नफा कमावला आहे. कंपनीच्या महसुलात 24284.38 कोटी रुपये किंवा 48.22 टक्क्यांनी वाढ झाली आहे. वर्षभरापूर्वी १६३८२.९७ कोटी रुपयांचा महसूल होता. एका वर्षापूर्वीच्या तुलनेत मार्च तिमाहीत रुची सोयाच्या एकूण उत्पन्नात 5.95 टक्के वाढ झाली आहे. त्याच वेळी, कराशिवाय नफा 29,569.13 लाख रुपये होता. मार्च तिमाहीत कंपनीची कमाई 37.38% आणि डिसेंबर 2022 तिमाहीच्या तुलनेत 5.95% वाढली. रुची सोयाने आपले नाव बदलून “पतंजली फूड्स लिमिटेड” ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच वेळी, कंपनी पतंजली आयुर्वेद लिमिटेडचा फूड रिटेल व्यवसाय ताब्यात घेईल. किरकोळ व्यवसाय रुची सोया इंडस्ट्रीजला 690 कोटी रुपयांना विकला जाईल.