इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बॉलीवूडवर सध्या संकटांची मालिका सुरू आहे. अनेक चित्रपट सपशेल आपटत आहेत. तर काही चित्रपट वादात अडकले आहेत. यातच आता बॉलीवूडची दुसरी बाजू लोकांसमोर येत आहे. ८० आणि ९० च्या दशकात असे चित्रपट बनवणारी एक समांतर चित्रपटसृष्टी तेव्हा बॉलिवूडमध्ये कार्यरत होती. डबल मिनिंग जोक, बोल्ड सीन्स आणि हॉरर सीन्ससह त्यावेळी बरेच चित्रपट बनवले जायचे ज्यांना ‘बी ग्रेड सिनेमा’ म्हणूनही ओळखलं जायचं. या बी ग्रेडचे सत्य आता समोर येणार आहे.
या चित्रपटांमध्ये हॉरर आणि ऍडल्ट चित्रपटांचा समावेश असायचा. आजच्या भाषेत याला ‘बिलो द बेल्ट’ असंही म्हणतात. धर्मेंद्रपासून राजेश खन्नापर्यंतच्या सुपरस्टार्सनाही अशा चित्रपटात काम करण्याचा मोह आवरता आलेला नाही. याच ‘बी ग्रेड’ चित्रपट विश्वावर एक माहितीपट लवकरच प्राइम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार ‘सिनेमा मरते दम तक’ नावाचा एक माहितीपट लवकरच प्राइम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
सहा भागांच्या या सिरिजमध्ये तेव्हाच्या ‘बी ग्रेड चित्रपट’विश्वाबद्दलच्या बऱ्याच गोष्टींवर प्रकाश टाकण्यात येणार आहे. या प्रकारच्या चित्रपटात नेमकं कशा पद्धतीने काम व्हायचं? हे चित्रपट करण्यात कोण माहिर होतं, याविषयी माहिती मिळणार आहे. त्या काळात असे चित्रपट सुपरहीट करून दाखवणारे दिग्दर्शक जे. नीलम, विनोद तलवार, दिलीप गुलाटी, किशन शाह ही मंडळी यात त्यांचे अनुभव शेअर करणार आहेत.
या माहितीपटात रजा मुराद, मुकेश ऋषि, राखी सावंत, हरिष पटेल, यांच्यासारखे बॉलिवूडमधले नावाजलेले कलाकारही दिसणार आहेत. शिवाय बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूरही या माहितीपटात दिसतील. प्रसिद्ध दिग्दर्शक वसन बाला आणि दिशा रंडानी हे हा माहितीपट आपल्यासमोर सादर करणार आहेत.
B Grade Movie OTT Marte Dum Tak Documentary