नाशिक : पोलिस आयुक्त दीपक पांडे शुक्रवारपासून (दि.२२) रजेवर गेले आहेत. जवळपास दहा दिवस रजेवर असलेल्या पोलिस आयुक्तांच्या कामाचा भार तात्पुरत्या स्वरूपात नाशिक परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक बी. जी. शेखर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. पोलिस आयुक्त दीपक पांडे १ नोव्हेंबर रोजी हजर होणार असून, तोपर्यंत या पदाची प्रशासकीय धुरा शेखर यांच्या खांद्यावर राहणार आहे. पोलिस आयुक्त पांडे शुक्रवारी दुपारपासून रजेवर गेलेत.