निफाड – केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक आरोग्य विभाग मार्फत उपजिल्हा रुग्णालय निफाड येथे आयुष्यमान आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सदरील मेळाव्याचे उद्घाटन आ. दिलीपराव बनकर व निफाडच्या नगराध्यक्षा रुपाली रंधवे यांच्या उपस्थितीत पार पडले. या आरोग्य मेळाव्यात एकूण १७८१ रुग्णांची मोफत तपासणी करून औषधपचार दिले गेले. या मेळाव्यात प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत १०४ पात्र रुग्णांना गोल्डन कार्ड प्रदान करण्यात आले. या कार्डद्वारे प्रति वर्ष प्रति कुटुंबास ५ लाख रुपये यांना वैद्यकीय विमा संरक्षणाचा लाभ मिळणार आहे. तर २०७ रुग्णांना डिजिटल हेल्थ कार्ड (युनिक कार्ड) तयार करून देण्यात आले, या शिबिरात विशेषतज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. रुग्णांना त्रास व गरजेनुसार विविध प्रकारच्या चाचण्या, नेत्रतपासणी करण्यात आल्या. या सोबत जिल्हा रुग्णालयातचे मार्फत निफाड तालुक्यातील रुग्णांना अपंगत्वाची प्रमाणपत्रे देण्यात आली. या निमित्ताने आयोजित रक्तदान शिबीरात २१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
या मेळाव्यामध्ये प्रमुख अतिथी म्हणून निफाडच्या प्रांत अधिकारी डॉ. अर्चना पठारे, तहसीलदार शरद घोरपडे, गटविकास अधिकारी संदीप कराड, जिल्हा रुग्णालय नाशिक येथील डॉ पंकज गाजरे, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य मधुकर शेलार, महेश चोरडिया, नगरसेवक सागर कुंदे, जावेद शेख,तसेच शिवाजी ढेपले, सचिन जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुजित कोशिरे, डॉ रोहन मोरे, डॉ समाधान पाटील, डॉ योगिता गायकवाड, डॉ साहेबराव गावले, डॉ संकेत आहेर, डॉ खैरनार, डॉ अमृता कटारे, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम चे डॉ सारंग मराठे , डॉ मकरंद निकम , डॉ सुनीता ढेपले, सहाय्यक अधीक्षक आरिफ पटेल, कनिष्ठ लिपिक भाऊसाहेब बागुल, प्रयोगशाळा अधिकारी भाऊसाहेब कोल्हे, पूर्णिमा कोंडके, वर्षा शिंदे, औषध निर्माण अधिकारी पराग चव्हाण, करपे नाना, नितीन चकोर, मेट्रन सहाय्यक दाभाडे, इंचार्ज सिस्टर फणसे,जाधव तसेच समुपदेशक नितीन परदेशी, शीतल नाटे, सुनील राठोड , सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांचे अधिकारी , कर्मचारी , सी एच् ओ , एमपीडब्ल्यू , परिचारिका , आशा कर्मचारी , पंचायत समिती कर्मचारी , प्रधान मंत्री कार्ड देणारे ऑपरेटर या सर्वांचे सहकार्य मिळाले.