विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
सतत वाढत असलेल्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर देशातील नागरिकांना दिलासा देणारी सकारात्मक एक बातमी समोर आली आहे. लसीकरणाबरोबरच आता कोरोनापासून बचाव करण्यासाठी आयुर्वेदिक औषधदेखील संशोधनातून सिद्ध झाले असून कोरोना उपचारात ते प्रभावी सिद्ध होत आहे.
आयुष मंत्रालयाने म्हटले आहे की, कोविड १९ च्या मध्यम आणि साधारण पातळीवरील बाधीत रूग्णांच्या उपचारांमध्ये आयुष ६४ नावाचे आयुर्वेदिक औषध अत्यंत प्रभावी असल्याचे सिद्ध होत असून त्याचे चांगले परिणाम मिळू लागले आहेत.
देशाच्या नामांकित संशोधन संस्थांमधील शास्त्रज्ञांना असे आढळले आहे की, आयुष मंत्रालयाच्या केंद्रीय आयुर्वेद संशोधन परिषदेने विकसित केलेले एक बहु-हर्बल फॉर्म्युला ‘ सिरफ 64 ‘ हे लाक्षणिक, सौम्य आणि मध्यम कोविड -१९ संसर्गांवर मानक उपचार करण्यासाठी उपयुक्त आहे.










