विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
पुढील ३० वर्षासाठी अयोध्याच्या विकासाचे मॉडेल लक्षात घेऊन केंद्र सरकारने रामनगरीच्या सर्वांगीण विकासासाठी व्हिजन डॉक्युमेंट -२०५१ तयार केले आहेत. रामायणातील रामनगरीच्या पुराणकथा वाचवून येथे आंतरराष्ट्रीय पर्यटन शहर म्हणून विकसित करण्याची योजना आहे. याच अनुषंगाने रामनगरीमध्ये १२०० एकरांवर वैदिक शहर विकसित केले जाणार आहे. या वैदिक सिटीमध्ये धार्मिकतेसह आधुनिकतेचा संगम दिसेल.
आवास विकास परिषद अयोध्येत १२०० एकर क्षेत्रात वैदिक शहर तयार करणार आहे. येथे मठ, मंदिर, ज्योतिष केंद्रासह अनेक देशांचे धार्मिक दूतावास तयार करण्याचे प्रस्तावित आहे. या वैदिक शहरात अयोध्याची वैभव, सभ्यता आणि संस्कृती यांचे थेट दर्शन होईल.
हाऊसिंग डेव्हलपमेंट कौन्सिल नवी अयोध्यामध्ये ८० भूखंड भारताच्या सभ्यता आणि संस्कृतीशी संबंधित देशांना देतील. धार्मिक दूतावास उघडण्यासाठी अर्ज केलेल्या देशालाही सुविधा उपलब्ध करुन दिली जाईल. हे वैदिक शहर थेट रामजन्मभूमीशी जोडण्याची योजना आहे.









