मुंबई – क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मूनमून धामेचा यांचा जामीन अर्ज आज कोर्टाने फेटाळला आहे. विशेष न्यायधीश व्ही.व्ही. पाटील यांनी आपला निर्णय राखून ठेवला होता. हा निर्णय आज दिला. त्यामुळे या तिघांचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे. दरम्यान हे आरोपी आता जामीनसाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल करणार आहे. ३ ऑक्टोंबरपासून आर्यन खान सह इतर आरोपी हे कोठडीत आहे. त्यामुळे त्यांना आता उच्च न्यायालयात दिलासा मिळतो का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.