टोकियो – येथे सुरू असलेल्या पॅरॉलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडू लक्षणीय कामगिरी करत असून, सोमवारी भारताच्या अवनी लेखराने नेमबाजी स्पर्धेत सुवर्णवेध घेतला आहे. अवनीने १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात २२९.१ गुणांसह सुवर्णपदकावर आपले नाव कोरून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. पॅरॉलिम्पिकमध्ये भारताचे हे सुवर्णपदक आहे.
यापूर्वी अवनी लेखरा पात्रता फेरीत ६२१.७ गुणांसह सातव्य स्थानावर होती. अवनीला अंतिम फेरीत चीनची नेमबाज झांगने जोरदार लढत दिली होती. परंतु अवनीने तिचा पराभव केला. झांगने २४८.९ गुण मिळवून दुसर्या स्थानावर राहिली. महिलांच्या दहा मीटर एअर सँडिग शूटिंग एसएच १ स्पर्धेत जागतिक क्रमवारीत अवनी पाचव्या स्थानावर आहे.
राजस्थानच्या जयपूर येथील अवनी लेखरा अकरा वर्षांची असताना तिचा अपघात झाला होता. त्यात तिच्या पाठीच्या मणक्याला दुखापत झाली होती. या अपघातामुळे तिला अर्धांगवायूचा झटकाही आला होता. अवनीने नेमबाजी आणि तिरंदाजी यो दोन्ही खेळात रस दाखवला होता. परंतु शेवटी तिने नेमबाजीत खेळण्याचे ठरविले.
पंतप्रधानांकडून कौतुक
अवनी लेखराने सुवर्णपदक पटकावल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिचे कौतुक केले आहे.
“विलक्षण कामगिरी. अवनी लेखरा तुझ्या मेहनती स्वभाव आणि नेमबाजीच्या आवडीमुळे हे शक्य झाले आहे. सुवर्णपदक जिंकल्याबद्दल अभिनंदन भावी प्रयत्नांसाठी शुभेच्छा “, असे पंतप्रधानांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.