मुंबई – सध्याच्या काळात अनेकांना स्वतःची कार असावी असे वाटते, परंतु कार घेतल्यानंतर मुख्य समस्या असते ती कार ड्रायव्हिंग करण्याची होय. स्वतः कार चालविणे ही अनेक जणांना अत्यंत अवघड गोष्ट वाटते. तसेच कारचालक ठेवणे देखील कटकटीचे वाटते. परंतु कार चालकाचा शिवाय चालली तर आश्चर्य वाटले ना परंतु आजच्या आधुनिक काळात हे शक्य आहे! कसे काय?
‘सेल्फ-ड्रायव्हिंग कार’ मुळे ते शक्य आहे, त्याला स्वायत्त वाहन, ड्रायव्हरलेस कार किंवा रोबोटिक कार म्हणूनही ओळखले जाते, या वाहन आजुबाजुचे वातावरण जाणून घेण्यास आणि कोणत्याही मानवी इनपुटशिवाय सुरक्षितपणे फिरण्यास सक्षम बनविले आहे. या तंत्रज्ञानाच्या भविष्याचा बहुविध उद्योगांवर आणि इतर परिस्थितींवर परिणाम होऊ शकतो.
अॅपलच्या ड्रायव्हरलेस ऑटोनॉमस इलेक्ट्रिक कारबद्दल अनेक दिवसांपासून चर्चा होत आहे. याच्याशी परिचित असलेल्या तज्ज्ञांच्या मते, Apple Inc. ही आपली इलेक्ट्रिक कार विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे आणि लवकरच पूर्ण स्व-ड्रायव्हिंग क्षमतेसह कार लॉन्च करण्याची योजना आखत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून, अॅपलच्या कार टीमने एकाच वेळी दोन मार्ग शोधले आहेत, एक म्हणजे मर्यादित स्वयं-ड्रायव्हिंग क्षमता असलेले मॉडेल तयार करण्यात येणार आहे. तर दुसरे म्हणजे अनेक विद्यमान कारच्या त्या स्टिअरिंग आणि एक्सीलरेटरवर लक्ष केंद्रित करणे आणि त्या पूर्ण स्व-ड्रायव्हिंग क्षमतेसह पूर्ण मानवी हस्तक्षेप शिवाय तयार करणे असे आहे.
अॅपल आपल्या नवीन प्रकल्प टायटनचे नेतृत्व करण्यासाठी केविन लिंचवर अवलंबून आहे. केविन लिंचने अॅपल वॉच सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचे नेतृत्व केले. केविन लिंच यांच्या नेतृत्वाखालील अभियंते आता दुसऱ्या पर्यायावर लक्ष केंद्रित करत आहेत. लिंच अॅपल कारची पहिली संपूर्ण सेल्फ-ड्रायव्हिंग सिस्टीम असलेली कार बनवण्यासाठी तंत्रज्ञ जोर देत आहे.
अॅपलने 2025 मध्ये त्यांची सेल्फ-ड्रायव्हिंग कार लॉन्च करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. तथापि, ही कालमर्यादा बदलू शकते, मात्र या दरम्यान, अॅपलने चार वर्षात आपली सेल्फ-ड्रायव्हिंग कार अंतर्गतपणे लॉन्च करण्याचे लक्ष्य ठेवले आहे, तसेच काही अभियंत्यांनी या वर्षाच्या सुरुवातीला नियोजित केलेल्या पाच ते सात वर्षांच्या टाइमलाइनपेक्षा वेगवान आहे. परंतु अॅपल आपले लक्ष्य गाठू शकले नाही, तर ते आपली कार लॉन्च करण्यास थोडासा विलंब करू शकते किंवा सुरुवातीला थोडी कमी-टेकनॉलॉची सेमी सेल्फ कार लॉन्च करू शकते.