इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कार मधून किंवा कोणत्याही वाहनातून प्रवास करताना त्या वाहनाची स्थिती व्यवस्थित तथा चांगली असणे आवश्यक असते. विशेषतः प्रवास लांबचा असो की, जवळचा कारचे टायर चांगले आहेत का ? हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. कारण टायर पंक्चर झाले तर प्रवासात अडचणी निर्माण होऊ शकतात.
कारचे टायर हे प्रवास करताना प्रवाशांची सुरक्षितता निश्चित करणारा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे त्यांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. जुने टायर वापरल्याने रस्त्यावर अधिक घर्षण निर्माण होते, परिणामी इंधनाचा वापर जास्त होतो. याशिवाय त्याचा स्फोट होऊन जीवित व वित्तहानीही होते. त्यामुळे ते वेळोवेळी तपासले पाहिजे.
कारच्या टायर्सचे लाईफ (आयुष्य ) तपासण्यासाठी नाणी वापरली जाऊ शकतात. ही एक मिनिट चाचणी प्रक्रिया कारच्या टायरची स्थिती सांगू शकते. हे तपासण्यासाठी अनेक नियम असले तरी हे काम तुम्ही खिशात एक रुपया ठेवूनही करू शकता.
टायरची स्थिती तपासण्यापूर्वी, सामान्य टायरचे आयुष्य काय आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे. एक सामान्य टायर सरासरी पाच वर्षे टिकतो. जर ते फॅक्टरीत तयार केलेले असेल तर ते 40 ते 50 हजार किमी पर्यंत चालण्यासाठी डिझाइन केलेले आहे.
टायर्सचे आयुष्य देखील कोणत्या प्रकारची गाडी चालवता यावर अवलंबून असते. रफ ड्रायव्हिंगमुळे अधिक घर्षण होते, ज्यामुळे टायर अधिक लवकर झिजतात. त्याचबरोबर खडबडीत रस्त्यांचाही परिणाम होतो.
टायरचे आयुष्य तपासण्यासाठी प्रथम एक नाणे घ्या आणि ते टायरच्या गॅपमध्ये (पकडीत ) टाका, नाणे जितके जास्त पकडीच्या आत जाईल तितके टायर जास्त काळ टिकेल. चांगल्या स्थितीतील टायरमध्ये, नाणे सुमारे एक चतुर्थांश आतमध्ये गेलेले राहते.
टायर झिजल्याने किंवा संपल्याने नाणे गॅपच्या पकडीत कमी जाते. याशिवाय सध्या असे टायरही बनवले जात आहेत ज्यात आत पिवळी पट्टी देण्यात आली आहे. कालांतराने हा पिवळा पट्टी टायरच्या झीजमुळे दिसू लागते. याचा अर्थ असा की टायर बदलण्याची वेळ आली आहे.
खूप जुने टायर घेऊन प्रवास करणे म्हणजे त्रासाला आमंत्रण देण्यासारखे आहे. आपल्याला माहित आहे की जुने टायर फुटण्याची शक्यता असते ज्यामुळे आपल्या जिवित आणि मालमत्तेची हानी होऊ शकते. तसेच टायर खराब झाल्यास चाकाचा तोल जाऊ शकतो. त्यामुळे गाडीचा तोल सांभाळणे कठीण होते. त्यामुळे टायर बदलणे गरजेचे ठरते.
Automobile Tips One Rupees Coin Car Tire Current Status