नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय बाजारात यंदा एकापेक्षा अधिक स्पोर्ट्स युटिलिटी वाहन बाजारात येण्यास तयार झाले आहेत. कॉम्पॅक्ट आणि छोट्या एसयूव्ही वाहनांची मागणी गेल्या काही महिन्यात झपाट्याने वाढली आहे. कमी किमतीत आणि चांगल्या युटिलिटीमुळे ग्राहकही वाहने अधिक पसंत करतात. त्यामुळे टाटा मोटर्स आणि ह्युंदाई सारख्या कंपन्या लवकरच बाजारात मायक्रो एसयूव्ही प्रकारातील नवीन मॉडेल्स सादर करणार आहे.
टाटा मोटर्सकडे भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये अनेक कार आहेत. या कार वेगवेगळ्या फीचर्स आणि किमतीच्या आहे. यातही प्रकार आहेत. आता ऑगस्ट महिन्यात या गाड्यांवर सवलतही मिळू शकते, जी काही निवडक मॉडेल्सवर उपलब्ध आहे. यामध्ये टाटा हॅरियर, सफारी, नेक्सॉन एसयूव्ही, टियागो आणि टिगोर हॅचबॅक कारचा समावेश आहे. टाटा नेक्सॉनला जागतिक सुरक्षिततेच्या दृष्टीने 5 स्टार रेटिंग मिळाले आहे. या निवडक टाटा कारवर उपलब्ध असलेल्या सवलतींबद्दल बोलायचं झाल्यास या ऑफरमध्ये रोख सवलत, एक्सचेंज बोनस, कॉर्पोरेट सूट आणि बरेच काही समाविष्ट आहे. हा लाभ 31 ऑक्टोबरपर्यंत घेता येईल. टाटा मोटर्सने या ऑफरमध्ये Tata Altroz प्रीमियम हॅचबॅक आणि पंच SUV समाविष्ट केलेले नाहीत. तसेच कोणत्या कारवर किती डिस्काउंट मिळत आहे ते जाणून घेऊ या…
टाटा हॅरियर :
Tata Motors च्या SUV कारला ऑगस्ट महिन्यात बरीच बचत करण्याची संधी मिळत आहे. Hyundai Creta आणि Kia Seltos च्या प्रतिस्पर्धी कारवर कमाल 45000 रुपयांची बचत करू शकतात. यामध्ये 40,000 रुपयांचे एक्सचेंज आणि 5000 रुपयांच्या कॉर्पोरेट बोनसचा समावेश आहे. टाटाच्या या SUV कारमध्ये 2.0 लीटर डिझेल इंजिन आहे, जे जास्तीत जास्त 168 bhp पॉवर जनरेट करू शकते. ते 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.
टाटा सफारी :
Mahindra XUV700 चे सर्वात मोठे प्रतिस्पर्धी Tata Safari वर 40,000 पर्यंत सूट मिळवू शकतात. हे फायदे या महिन्याच्या अखेरीस दार ठोठावू शकतात. हे फायदे केवळ वापरलेल्या कारच्या एक्सचेंजवर उपलब्ध आहेत. या 7 सीटर एसयूव्हीची किंमत 14.99 लाख रुपयांपासून सुरू होते आणि ते वाहन 23.29 लाख रुपयांपर्यंत जाते. याला हॅरियरसारखे 2.0-लिटर डिझेल इंजिन मिळते, जे 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.
टाटा टिगोर :
टाटा मोटर्सची सब-कॉम्पॅक्ट सेडान पेट्रोल व्यतिरिक्त CNG आणि इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये यूजर्सला एक्स-शोरूम किंमतीवर 23 हजार रुपयांची सूट दिली जात आहे. मात्र, ही ऑफर फक्त XE, XM आणि XZ व्हेरियंटमध्येच मिळू शकते. यामध्ये सीएनजी प्रकाराचा समावेश करण्यात आलेला नाही. यामध्ये 10,000 रुपयांपर्यंतची कॅश डिस्काउंट मिळू शकते.
टाटा टिगोर ही कंपनीची कॉम्पॅक्ट सेडान कार आहे, जिची किंमत 5.79 लाख रुपयांपासून सुरू होते आणि ती 8.41 लाख रुपयांपर्यंत जाते. सध्या ती मारुती सुझुकी डिझायर, ह्युंदाई ऑरा आणि होंडा अमेझ सारख्या वाहनांशी स्पर्धा करते.
टाटा टियागो :
टाटा मोटर्सच्या या छोट्या हॅचबॅक कारवर देखील Tigor प्रमाणे सूट मिळत आहे, ज्या अंतर्गत वापरकर्त्यांना भरपूर पैसे वाचवण्याची संधी मिळेल. लक्षात ठेवा की या ऑफरमध्ये CNG व्हेरिएंटचा समावेश नाही. वरील ऑफर जाणून या तुम्हाला फायदेशीर ठरू शकतात. या महिन्यात तुम्हाला नवी कार घरी आणण्यासाठी वरील कोही पर्याच आम्ही दिले आहेत. यामध्ये इंजिन आणि फीचर्सही सारखेच आहेत. यात सध्या 30 हजारांपर्यंत सूट मिळवून टिगोर घेऊ शकता. यात 1.2-लिटर तीन-सिलेंडर पेट्रोल इंजिन (86PS/113Nm) मिळते, जे 5-स्पीड मॅन्युअल आणि 5-स्पीड AMT शी जुळते. त्याची स्पर्धा मारुती सुझुकी वॅगनआर, ह्युंदाई सँट्रो यांसारख्या वाहनांशी आहे.
टाटा नेक्सॉन :
Tata Nexon ही फेब्रुवारीमध्ये सर्वाधिक विक्री होणारी SUV कार ठरली आहे. मार्चमध्ये यावर 25,000 रुपयांपर्यंत सूट आहे. हे 110hp, 1.5-लीटर टर्बो-डिझेल आणि 120hp, 1.2-लीटर टर्बो-पेट्रोल इंजिनसह उपलब्ध आहे, मॅन्युअल आणि AMT गिअरबॉक्स पर्यायांसाठी जोडलेले आहे. ते Hyundai Venue, Kia Sonet आणि Maruti Vitara Brezza सारख्या वाहनांशी स्पर्धा करते. नेक्सॉनला ग्लोबल NCAP कडून 5-स्टार सुरक्षा रेटिंग देखील मिळाले आहे.
टाटा कारची वैशिष्ट्ये :
Tata Motors च्या SUV कारला ऑगस्ट महिन्यात बरीच बचत करण्याची संधी.
Hyundai Creta आणि Kia Seltos च्या प्रतिस्पर्धी कारवर कमाल 45000 रुपयांची बचत.
40,000 रुपयांचे एक्सचेंज आणि 5000 रुपयांच्या कॉर्पोरेट बोनसचा समावेश.
टाटाच्या या SUV कारमध्ये 2.0 लीटर डिझेल इंजिन, जास्तीत जास्त 168 bhp पॉवर जनरेट करू शकते.
Automobile TATA New Car Buy Discount Model Offers