मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – टाटा मोटर्स आघाडीच्या कारमध्ये कायमच स्पर्धेत राहिले आहेत. मात्र त्यांच्या काही खास गाड्यांनी इतर कंपन्यांना मागे टाकलं आहे. यात विशेषतः नेक्सॉन आणि टाटा पंच या दोन गाड्यांचा समावेश होतो. मार्च २०२३ मध्ये या दोन गाड्यांची सर्वाधिक विक्री झाल्याची नोंद आहे.
टाटा मोटर्सने मार्च २०२३ मध्ये ४४,०४४ कार विकल्या. गेल्या वर्षी ही संख्या ४२ हजार २९३ एवढी होती. कंपनीची नेक्सॉन ही सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली आहे. नेक्सॉनने मार्च २०२३ मध्ये १४,७६९ युनिट्सची विक्री केली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत ३ टक्क्यांनी अधिक विक्रीची नोंद झाली आहे. फेब्रुवारी २०२३ मध्ये कार निर्मात्याने त्यातील १३ हजार ९१४ गाड्यांची विक्री केली होती. टाटा नेक्सॉन ही एक अतिशय लोकप्रिय एसयूव्ही आहे. \
नेक्सॉनला ग्लोबल एनसीपीएकडून फाईव्ह स्टार सुरक्षा रेटिंग मिळाले आहे. टाटा पंचने खूप वेगाने लोकप्रियता मिळवली. लाँच होऊन जवळपास दीड वर्ष झाले असतील पण याने आधीच टॉप-५ विकल्या जाणार्या एसयूव्हीमध्ये आपले स्थान निर्माण केले. एवढेच नाही तर सर्वाधिक विक्री होणाऱ्या अव्वल दहा कारमध्येही टाटा पंचचा समावेश आहे. मार्च २०२३ मध्ये १० हजार ८९४ युनिट्सची विक्री झाली, तर गेल्या वर्षी मार्चमध्ये १० हजार ५२६ युनिट्सची विक्री झाली.
टियागोचाही माहोल
टाटा टियागो ही कंपनीची तिसरी सर्वाधिक लोकप्रिय कार आहे. यावर्षी मार्चमध्ये या एंट्री-लेव्हल हॅचबॅक कारच्या ७ हजार ३६६ युनिट्सची विक्री झाली. तर गेल्या वर्षी ४ हजार युनिट्सची विक्री झाली होती.यात १.२-लीटर पेट्रोल इंजिन आहे, जे ५-स्पीड मॅन्युअल आणि ५-स्पीड AMT गिअरबॉक्स या पर्यायांसह उपलब्ध आहे. यामध्ये सीएनजीचा पर्यायही उपलब्ध आहे.
Automobile Tata Car Best Selling