इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पेट्रोल डिझेल सारख्या इंधनाचे भाव गगनाला भिडल्याने कोणालाही कारवा अन्य वाहने चालविणे परवडत नाही मात्र आता सोलर चार्जिंग असलेली कार बाजारात दाखल होणार आहे. ही कार रोडवर धावताना आपोआप चार्ज होईल. खरे म्हणजे जर्मन स्टार्ट-अप सोनो मोटर्सनेसौर उर्जेने बॅटरी चार्ज करणारी इलेक्ट्रिक कार द सायनची अंतिम मालिका उत्पादन प्रकाराचं अनावरण केलं आहे. भारतीय बाजारपेठेत अनेक इलेक्ट्रिक कार आहेत.
यावर्षी होंडा टोयोटा आणि मारुतीनं आपापल्या हायब्रिड कार सादर केल्या आहेत. ही कार लाँच केल्यानंतर अनेक वाहनांना मात देऊ शकते. कारण, गाडीला इंधनाचा खर्च नाही. गाडी आपोआप रोडवर चालताना चार्ज होईल. याचाच अर्थ असा की, थेट आपल्या खर्चावर परिणाम होईल म्हणजे आपला इंधनाचा खर्च वाचेल. यामुळे ही कार येण्याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.
सोनो मोटर्सच्या या नवीन कार उत्पादन पुढील वर्षी 2023 पासून सुरू होईल. येत्या सात वर्षांत 2.5 लाख वाहनांचं उत्पादन करण्याचं कंपनीचं उद्दिष्ट आहे. या सौरऊर्जेवर चालणाऱ्या कारचे प्री-बुकिंग सुरू झाले असून कंपनीला 19000 युनिट्सचे प्री-बुकिंग मिळाले आहे. या कारची संभाव्य किंमत 25000 डॉलर म्हणजे 19,94,287 रुपये असू शकते. मात्र, कंपनीनं अद्याप त्याची एक्स-शोरूम किंमत जाहीर केलेली नाही.
भारतासह इतर देशांमध्ये केव्हा लाँच होईल हे कंपनीने अद्याप सांगितलेले नाही. मात्र हे वाहन पाच दरवाजांचे इलेक्ट्रिक वाहन आहे. ज्यामध्ये 456 सोलर पॅनल बसवण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत ही कार 112 किमी पेक्षा जास्त अंतर कापू शकते. त्याची बॅटरी चार्ज करण्याचा पर्याय देखील उपलब्ध असेल, ज्याच्या मदतीनं एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ती 300 किमीपर्यंत प्रवास करू शकते.
सोलर पॅनेल हे एक प्रकारचे कन्व्हर्टर आहे. ते सूर्यापासून येणाऱ्या प्रकाशाचे विद्युत उर्जेमध्ये रूपांतर करते. सौर पॅनेल अनेक सौर पेशींनी बनलेले असतात. सूर्यापासून येणाऱ्या प्रकाराला विज्ञानात फोटॉन म्हणतात. सोलर सेलमधून मिळणारी विद्युत ऊर्जा सौर इन्व्हर्टरच्या मदतीने बॅटरीमध्ये साठवली जाते किंवा ती घरात वापरली जाते. विशेष म्हणजे ही गाडी आपोआप रोडवर चालताना चार्ज होईल. याचाच अर्थ असा की, थेट आपल्या खर्चावर परिणाम होईल म्हणजे आपला इंधनाचा खर्च वाचेल. यामुळे या कारची विशेष वाट पाहिली जात आहे.
नेदरलँड्स कंपनी लाइटइयरने जगातील पहिली सोलर इलेक्ट्रिक कार सादर केली आहे. वास्तविक, कंपनीने आपले पहिले उत्पादन तयार वाहन सादर केले आहे. कंपनीने लाइटइयर झिरो या नावाने ही सोलर बॅटरी कार सादर केली आहे जी सौर आणि विद्युत ऊर्जेवर चालेल. कंपनीचा दावा आहे की ही इलेक्ट्रिक कार एका चार्जमध्ये १००० किमी पर्यंत चालवता येते. तसेच, हायवेवर ११० किमी/तास वेगाने गाडी चालवल्यास त्याची रेंज ५६० किमी/ताशी कमी होईल.
या कंपनीने लाइटइयर झिरोसाठी २.५० लाख युरो म्हणजेच सुमारे २ कोटी रुपये भांडवल लावले आहेत. तसेच, कंपनीचे म्हणणे आहे की नेक्स्ट इलेक्ट्रिक कारचे बजेट ३०,००० युरो म्हणजेच अंदाजे २७ लाख रुपये असेल. तसेच ही एक फॅमिली सेडान कार आहे ज्यामध्ये पाच स्क्वेअर मीटरचे सोलर पॅनल बसवण्यात आले आहेत. त्यांच्या मदतीने ही कार एका दिवसात ७० किमीची रेंज देऊ शकते. तसेच, वर्ल्डवाइड हार्मोनाइज्ड लाइट व्हेईकल टेस्ट प्रोसिजर चाचणी दरम्यान, या कारने ६२५ किमी अंतर कापले होते.
Automobile Solar Car Coming Soon