भारतात लॉन्च झाल्या ऑडीच्या या लक्झुरीअस कार…
मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ऑडी या जर्मन लक्झरी कार उत्पादक कंपनीने आज ऑडी क्यू३ आणि ऑडी क्यू५ सिग्नेचर लाइन लाँच केली, जेथे विशेष डिझाइन घटक, प्रीमियम तपशील आणि उपकरणांची भर करत त्यांच्या लक्झरी एसयूव्ही ऑफरिंग्जना अधिक उत्साहित करण्यात आले आहे.
सिग्नेचर लाइन पॅकेज प्रशंसित ऑडी क्यू३ आणि ऑडी क्यू५ मध्ये विशिष्ट ऑडी वैशिष्ट्यांची भर करते, ज्यामध्ये प्रकाशित ऑडी रिंग्ज एण्ट्री एलईडी लॅम्प्स, बीस्पोक ऑडी डेकल्स आणि डायनॅमिक व्हील हब कॅप्स आहेत, जे गतीमध्ये देखील परिपूर्ण लोगो ओरिएन्टेशन राखतात. याला पूरक केबिन फ्रॅग्रॅनन्स डिस्पेन्सर, मेटलिक की कव्हर आणि स्टेनलेस-स्टील पेडल सेट आहे, जे क्यूच्या आतील व बाहेरील लक्झरी भावनेला अधिक उत्साहित करतात.
तसेच, ऑडी क्यू३ सिग्नेचर लाइनमध्ये पार्क असिस्ट प्लस, नवीन आर१८, ५-व्ही-स्पोक (एस डिझाइन) अलॉई व्हील्स, १२-व्होल्ट आऊटलेट आणि रिअर कम्पार्टमेंटमध्ये २ यूएसबी पोर्टसची भर करण्यात आली आहे. ऑडी क्यू५ सिग्नेचर लाइनमध्ये नवीन आर१९, ५-ट्विन-आर्म, ग्रॅफाईट ग्रे, ग्लॉस टर्न फिनिश अलॉई व्हील्स आहेत, जे कारच्या एकूण लुकला अधिक आकर्षित करतात.
ऑडी क्यू३, ऑडी क्यू३ स्पोर्टबॅक आणि ऑडी क्यू५ ची एक्सशोरूमची किंमत अनुक्रमे ५,२३१,०००, ५,३५५,००० आणि ६,९८६,००० रुपये आहे.
ऑडी इंडियाचे प्रमुख श्री. बलबीर सिंग धिल्लों म्हणाले, ”ऑडी क्यू३ आणि ऑडी क्यू५ भारतातील आमच्या क्यू पोर्टफोलिओच्या कोनशिला आहे, ज्या ग्राहक पसंती आणि विभागातील कार्यक्षमतेमध्ये सतत आघाडीवर आहेत. ऑडी क्यू३ व ऑडी क्यू५ सिग्नेचर लाइनसह आम्ही अत्याधुनिक पॅकेजमध्ये सुधारित कार्यक्षमता आणि प्रगत वैशिष्ट्ये वितरित करणे सुरू ठेवले आहे. हे एडिशन नाविन्यता आणि ग्राहक-केंद्रित डिझाइनवरील आमचा फोकस अधिक दृढ करते. सिग्नेचर लाइनसह आम्ही ग्राहकांना ऑडी क्यू३ आणि ऑडी क्यू५ वर अधिक विशेष श्रेणीचे मालक बनण्याची संधी देत आहोत.”
सिग्नेचर लाइनची वैशिष्ट्ये:
सिग्नेचर लाइन पॅकेज ऑडी क्यू३ आणि ऑडी क्यू५ मध्ये सुधारित, बीस्पोक स्टायलिंग अपग्रेड्स आणते, जेथे विशेष घटकांसह डिझाइनला अधिक आकर्षक करते, ज्यामधून अत्याधुनिकता आणि विशिष्टता दिसून येते, सर्वोत्तम वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे:
- ड्रॅमॅटिक वेलकम प्रोजेक्शनसाठी ऑडी रिंग्ज एण्ट्री एलईडी लॅम्प्स.
- ब्रँड ओळख वाढवणारे विशिष्ट ऑडी रिंग्ज डेकल्स.
- डायनॅमिक व्हील हब कॅप्स, जे चार रिंग्जना परिपूर्णपणे एका रेषेत ठेवतात.
- केबिनमध्ये उत्साहवर्धक वातावरणासाठी फ्रँग्रॅनन्स डिस्पेन्सर.
- मेटलिक की कव्हर प्रीमियम स्पर्श अनुभवाची भर करते.
- स्टेनलेस स्टील पेडल कव्हर्स स्पोर्टी इंटीरिअर आकर्षण देते.
सिग्नेचर लाइन टेक्नॉलॉजी व्हेरिएण्टसह विशेष पॅक केलेली आहे आणि सिग्नेचर लाइनमधील विशिष्ट वैशिष्ट्ये ऑडी जेन्यूएन अॅक्सेसरीजचा भाग आहेत.








