इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कार किंवा कोणत्याही वाहनातून प्रवास करताना त्या वाहनाची स्थिती व्यवस्थित तथा चांगली असणे आवश्यक असते. विशेषतः प्रवास लांबचा असो की, जवळचा कारचे टायर चांगले आहेत का? हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. कारण टायर मध्ये हवा कमी असेल किंवा पंक्चर झाले तर प्रवासात अडचणी निर्माण होऊ शकतात. कारचे टायर हे प्रवास करताना प्रवाशांची सुरक्षितता निश्चित करणारा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे त्यांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. जुने टायर वापरल्याने रस्त्यावर अधिक घर्षण निर्माण होते, परिणामी इंधनाचा वापर जास्त होतो. त्यामुळे ते वेळोवेळी तपासले पाहिजे.प्रत्येक आठवड्याला टायरमध्ये हवा भरत जा. पैसे लागत नाहीत, पेट्रोल पंपांवर फुकटात हवा भरून दिली जाते. ती सेवाच असल्याने बंधनकारक आहे.
अनेकदा आपण गाडीचे मायलेज कमी झाल्याची तक्रार करतो किंवा ऐकतो. परंतू, त्याचे कारण काय आहे हे पाहत नाही. अनेकांच्या गाड्या एकाच जागी दिवसेंदिवस उभ्या असतात. काहींच्या फिरतही असतात. परंतू, टायरमधील हवा जी असते ती हळू हळू दाबामुळे कमी कमी होऊ लागते, याकडे लक्षच देत नाही. मग मायलेज कमी होऊ लागते.
टायरमध्ये एअर प्रेशर किती असावे यावरून देखील मतभिन्नता आहे. जर तुमची कार आठवडा आठवडा उभी राहत असेल तर प्रत्येक आठवड्याला टायरमध्ये हवा भरत जा. पैसे लागत नाहीत, पेट्रोल पंपांवर फुकटात हवा भरून दिली जाते. ती सेवाच असल्याने बंधनकारक आहे. तेवढेही जमत नसेल तर तुमच्या खिशावर हळूहळू ताण वाढू लागतो आणि कधी कधी जिवावर देखील बेतू शकते.
गाडीमध्ये जास्त माणसे किंवा साहित्य असेल तर टायरमधील हवेचे प्रेशर वेगळे ठेवावे लागते. मध्यम वजन असेल तर मध्यम प्रेशर आणि जर तुम्ही एकटेच कार मधून जात असाल तर कमी. परंतू आपण सरकरट एकच एअर प्रेशर ठेवतो आणि फसतो. खूप कमीही असून नये आणि जास्तही. कारण कमी असल्याने किंवा जास्त असल्याने टायर फुटून अपघाताची शक्यता असते. तसेच कमी असले तर गाडी पिकअप घेताना जास्त ताकद लावते तसेच टायरचीही झिज होते. यामुळे इंधन जास्त जाळले जाते.
हवा जास्त असेल तर गाडी रस्त्याला धरून चालत नाही. टायर तापल्याने फुटण्याची शक्यताही असते. तसेच सस्पेन्शनही मार खाते. हे झाले फाय़दे तोटे. साधारणपणे ३० ते ३२ किंवा ४० पीएसआय असे टायरचे प्रेशर त्या त्या गाडीच्या प्रकारावर अवलंबून असते. महत्वाचे म्हणजे याबाबतचा तक्ता तुम्हाला ड्रायव्हरचा दरवाजा उघडला की आतील बॉडीवर दिसेल. जर तुम्ही हवा चेक करत असाल तर थोडे थांबा आणि मग तपासा. कारण टायर तापलेला असेल तर आतील हवाही तापून प्रसरण पावलेली असते. यामुळे चुकीचे पीएसआय मिळते. हवा कमी केली तर जेव्हा टायर थंड होतो, तेव्हा कमी पेक्षाही कमी प्रेशर असते.
Automobile Car Tire Air Pressure Fuel Consumption