शुक्रवार, ऑगस्ट 29, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

ऑडीने भारतात लॉन्च केल्या या आलिशान इलेक्ट्रिक कार.. एवढ्या वेळात चार्ज होणार… इतकी किमी धावणार…

by Gautam Sancheti
ऑगस्ट 20, 2023 | 5:28 am
in संमिश्र वार्ता
0
Audi Q8 e tron and Audi Q8 Sportback e tron 1

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ऑडी या जर्मन लक्‍झरी कार उत्‍पादक कंपनीने आज नवीन ऑडी क्‍यू८ ई-ट्रॉन तिच्‍या जागतिक लाँचच्या काही महिन्‍यांनंतर भारतात लाँच केली. चार व्‍हेरिएण्‍ट्स ऑडी क्‍यू८ ५० ई-ट्रॉन, ऑडी क्‍यू८ ५५ ई-ट्रॉन, ऑडी क्‍यू८ स्‍पोर्टबॅक ५० ई-ट्रॉन आणि ऑडी क्‍यू८ स्‍पोर्टबॅक ५५ ई-ट्रॉन त्‍यांच्‍या सुधारित ड्रायव्हिंग वैशिष्‍ट्यांसह स्‍वप्‍नवत ड्राइव्‍हचा अनुभव देतात. ११४ केडब्‍ल्‍यू बॅटरी (विभागामध्‍ये सर्वात मोठी) असलेल्‍या ऑडी क्‍यू८ ५५ ई-ट्रॉन आणि ऑडी क्‍यू८ स्‍पोर्टबॅक ५५ ई-ट्रॉन एकाच चार्जमध्‍ये (डब्‍ल्‍यूएलटीपी प्रमाणित) जवळपास ६०० किमीपर्यंतची इंडस्‍ट्री-बेस्‍ट ड्रायव्हिंग रेंज देतात. ऑडी क्‍यू८ ५० ई-ट्रॉन आणि ऑडी क्‍यू८ स्‍पोर्टबॅक ५० ई-ट्रॉन एकाच चार्जमध्‍ये (डब्‍ल्‍यूएलटीपी प्रमाणित) जवळपास ५०५ किमीची ड्रायव्हिंग रेंज देतात.

ऑडी क्‍यू८ ई-ट्रॉनमध्‍ये नवीन डिझाइनसह लक्‍झरीअस आरामदायीपणा, सुधारित कार्यक्षमता, सर्वात मोठ्या बॅटऱ्या आणि सुधारित ड्राइव्‍ह रेंज आहे, जे ई-ट्रॉनचा वारसा व यशाला पुढे घेऊन जातात. या लाँचसह ऑडीने नवीन कॉर्पोरेट ओळख देखील निर्माण केली आहे, जेथे चार रिंग्‍सची नवीन, द्विमितीय डिझाइन लक्‍झरी गतीशीलतेसह शाश्‍वततेची खात्री देते. ऑडी क्‍यू८ ५० ई-ट्रॉन, ऑडी क्‍यू८ ५५ ई-ट्रॉन, ऑडी क्‍यू८ स्‍पोर्टबॅक ५० ई-ट्रॉन आणि ऑडी क्‍यू८ स्‍पोर्टबॅक ५५ ई-ट्रॉनची एक्स-शोरूम किंमत अनुक्रमे ११,३७०,०००, १२,६१०,०००, ११,८२०,००० आणि १३,०६०,००० रुपये आहे.

ऑडी इंडियाचे प्रमुख श्री. बलबीर सिंग धिल्‍लों म्‍हणाले, “आज आम्‍ही आमच्‍या इलेक्ट्रिक गतीशीलतेच्या प्रवासामध्‍ये आणखी एक पाऊल उचलत आहोत. आम्‍हाला या आकर्षक इलेक्ट्रिक कार्स लाँच करण्‍याचा अधिक आनंद होत आहे. सर्वात मोठे बॅटरी पॅक्‍स अतिरिक्‍त रेंज देण्‍यासह मॉडेल्‍सच्‍या मूल्‍य तत्त्वामध्‍ये देखील वाढ करतात. नवीन उत्‍साहवर्धक स्‍टायलिंग रचनेमधील सुधारणांशी पूरक आहे आणि निश्चितच सर्वांचे लक्ष वेधून घेईल. ऑडी क्‍यू८ ई-ट्रॉन आमच्‍या इलेक्ट्रिक गतीशीलता धोरणामध्‍ये प्रमुख वेईकल आहे आणि आम्‍ही आमच्‍या लाइन-अपला इलेक्ट्रिफाईंग करण्‍याच्‍या दिशेने वाटचाल करत असताना आम्‍हाला निर्मितीसाठी प्रबळ पाया देते. नवीन ऑडी क्‍यू८ ई-ट्रॉन आणि ऑडी क्‍यू८ स्‍पोर्टबॅक ई-ट्रॉनच्‍या सादरीकरणासह आमचा आता विभागामध्‍ये व्‍यापक ईव्‍ही पोर्टफोलिओ आहे.”

वैशिष्‍ट्ये:
ड्राइव्‍ह व कार्यक्षमता:
 पुढील व मागील बाजूस इलेक्ट्रिक मोटर्ससह ऑडी क्‍यू८ ५५ ई-ट्रॉन व ऑडी क्‍यू८ स्‍पोर्टबॅक ५५ ई-ट्रॉन ४०८ एचपी शक्‍ती आणि ६६४ एनएम टॉर्कची निर्मिती करतात.
 तसेच, ऑडी क्‍यू८ ५० ई-ट्रॉन व ऑडी क्‍यू८ स्‍पोर्टबॅक ५० ई-ट्रॉन ३४० एचपी शक्‍ती आणि ६६४ एनएम टॉर्कची निर्मिती करतात.
 ऑडी क्‍यू८ ५५ ई-ट्रॉन व ऑडी क्‍यू८ स्‍पोर्टबॅक ५५ ई-ट्रॉन फक्‍त ५.६ सेकंदांमध्‍ये ० ते १०० किमी/तास गती प्राप्‍त करतात, तर ऑडी क्‍यू८ ५० ई-ट्रॉन व ऑडी क्‍यू८ स्‍पोर्टबॅक ५० ई-ट्रॉनला यासाठी ६.० सेकंद घेतात.
 या कार्समध्‍ये आयकॉनिक ई-क्‍वॉट्रा ऑल-व्‍हील ड्राइव्‍ह सिस्‍टमसह ऑडी ड्राइव्‍ह सिलेक्‍टशी संलग्‍न तीन मोड्स: ऑटो, डायनॅमिक व ऑफ-रोड आहेत.

 नवीन प्रोग्रेसिव्‍ह स्टिअरिंग कमी प्रयत्‍नामध्‍ये अचूक कॉर्नरिंग व स्टिअरिंग वापराची आणि अधिक फिडबॅक देते.
 अॅडप्टिव्‍ह एअर सस्‍पेंशन अॅडजस्‍टेबल राइड हाइटसह प्रदान करण्‍यात आले आहे, ज्‍यामुळे ऑडी क्‍यू८ ई-ट्रॉन सर्व प्रदेशांमध्‍ये ड्राइव्‍ह करण्‍यासाठी अनुकूल आहे.
 ऑडी ड्राइव्‍ह सिलेक्‍टसह सात ड्राइव्‍ह मोड्स ड्रायव्‍हरला एकाच क्लिकमध्ये ऑडी क्‍यू८ ई-ट्रॉनच्‍या ड्रायव्हिंग गतीशीलतेमध्‍ये बदल करण्‍याची सुविधा देतात.
 या कार्समध्‍ये २२६ मिमीचे (बेस्‍ट-इन-क्‍लास) अधिकतम ग्राऊंड क्‍लीअरन्‍स आहे, ज्‍यामुळे या कार्स खडतर प्रदेशांमध्‍ये सहजपणे ड्राइव्‍ह करता येऊ शकतात.

कार्यक्षमता व चार्जिंग:
 ऑडी क्‍यू८ ५५ ई-ट्रॉन व ऑडी क्‍यू८ स्‍पोर्टबॅक ५५ ई-ट्रॉन अनुक्रमे जवळपास ५८२ किमी आणि ६०० किमीची रेंज (डब्‍ल्‍यूएलटीपी प्रमाणित) देतात, ज्‍याचे श्रेय त्‍यांच्‍या विस्‍तारित ११४ केडब्‍ल्‍यूएच (बेस्‍ट-इन-इंडस्‍ट्री) लिथियम-आयन बॅटऱ्यांना जाते. यामुळे या कार्स लांबच्‍या प्रवासासाठी अनुकूल आहेत.
 ऑडी क्‍यू८ ५० ई-ट्रॉन व ऑडी क्‍यू८ स्‍पोर्टबॅक ५० ई-ट्रॉन या दोन्‍ही कार्समध्‍ये ९५ केडब्‍ल्‍यूएच लिथियम-आयन बॅटरी आहे, जी अनुक्रमे जवळपास ४९१ किमी व ५०५ किमीची रेंज (डब्‍ल्‍यूएलटीपी प्रमाणित) देते.
 जवळपस २२ केडब्‍ल्‍यू एसी व १७० केडब्‍ल्‍यू डीसीपर्यंत चार्जिंग उपलब्‍ध आहे (बेस्‍ट-इन-क्‍लास).

 सुलभ पार्किंग आणि सहज वापरासाठी दोन्‍ही बाजूंना चार्जिंग सॉकेट्स देण्‍यात आले आहेत.
 पॅडल शिफ्टर्सद्वारे एमएमआय मॅन्‍युअल सिलेक्‍शन करत रिकपरेशनच्‍या तीन पातळ्या ऑटोमॅटिक मोड किंवा मॅन्‍युअलमध्‍ये सेट करता येऊ शकतात.
 चार्जिंग वेळ २६ मिनिटांमध्‍ये २० टक्‍के ते ८० टक्‍क्‍यांपर्यंत.
 चार्जिंग वेळ ३१ मिनिटांमध्‍ये १० टक्‍के ते ८० टक्‍क्‍यांपर्यंत.
 ‘मायऑडी कनेक्‍ट’ अॅपचा भाग म्‍हणून संपूर्ण भारतातील १००० हून अधिक चार्ज पॉइण्‍ट ऑपरेटर्सकडे एक वर्षापर्यंत ऑडी क्‍यू८ ई-ट्रॉन ग्राहकांसाठी कॉम्‍प्‍लीमेण्‍टरी चार्जिंग सुविधा.

आकर्षक एक्‍स्‍टीरिअर:
 नवीन फ्रण्‍ट व रिअर डिझाइनसह वैशिष्‍ट्यपूर्ण सिंगल फ्रेम मास्‍क.
 ऑडी सिंगल फ्रेम प्रोजेक्‍शन लाइट्ससह चार रिंग्‍सची नवीन द्विमितीय डिझाइन.
 डिजिटल मॅट्रिक्‍स एलईडी हेडलाइट्ससह अॅनिमेटेड लायटिंग प्रोजेक्‍शन्‍स अनुकूल प्रकाश वितरणासाठी नवीन क्षमता देतात.
 नऊ एक्‍स्‍टीरिअर कलर पर्याय – मॅडेरा ब्राऊन, क्रोनोस ग्रे, ग्‍लेशियर व्‍हाइट, मिथोस ब्‍लॅक, प्‍लाझ्मा ब्‍ल्‍यू, सोनेरा रेड, मॅग्‍नेट ग्रे, मॅनहॅटन ग्रे आणि सियाम बिज.

 ऑडी एक्‍सक्‍लुसिव्‍ह कस्‍टमायझेशनच्‍या माध्‍यमातून एक्‍स्‍टीरिअर रंगांचे व्‍यापक पॅलेट प्रदान करण्‍यात आले आहे.
 लाल रंगाचे ब्रेक कॅलिपर्स वैशिष्‍ट्यपूर्ण स्‍टाइल स्‍टेटमेंट करतात.
 आर२०, ५-आर्म ‘ऐरो’ रिंग स्‍टाइल, ग्रॅफाईट ग्रे, डायमंड-टर्न अलॉई व्‍हील्‍स प्रिमिअम दर्जा वाढवतात.
 पुढील व मागील बाजूस असलेल्‍या दरवाज्‍यांच्‍या प्रवेशद्वारावरील एलईडी प्रोजेक्‍टर लाइट्स डिझाइनला अधिक आकर्षक करतात.

आरामदायीपणा व तंत्रज्ञान:
 पार्क असिस्‍ट प्‍लस बटनाच्‍या प्रेसमध्‍ये सुलभ पार्किंग देते. सिस्‍टम स्‍मार्ट असून अवघड पार्किंग जागांना (समांतर व क्रमिक) ओळखते. ब्रेकिंग, ऑटोमॅटिक गिअर शिफ्टिंग आणि अडथळा असल्‍यास फुल ब्रेकिंगचा वापर करत कारला मॅन्‍युअर करण्याची सुविधा देते.
 ३डी सराऊंड-व्‍ह्यू कॅमेरांसह सानुकूल व्‍ह्यूज व पिंच आणि झूम फंक्‍शन अवघड जागी नेव्हिगेशन सुलभ करतात.
 सामान कक्षाच्‍या सुलभ उपलब्‍धतेसाठी गेस्‍चर-नियंत्रित बूट लिड.
 ४-झोन क्‍लायमेट कंट्रोल व्‍यक्‍तीच्‍या आरामदायीपणानुसार वैयक्तिकृत कूलिंग/हिटिंग देतो.
 केबिनमध्‍ये ताज्‍या हवेच्‍या अनुभवासाठी एअर आयोनायझर व अरोमॅटायझेशन.

इंटीरिअर व इन्‍फोटेन्‍मेंट:
 तीन कलर पर्याय – ओकापी ब्राऊन, पर्ल बीज आणि ब्‍लॅक. व्‍हॅल्‍कोना व मिलानो लेदर सीट
अपहोल्‍स्‍टरी आणि लेदर व लेदरेट कॉम्‍बीनेशन अपहोल्‍स्‍टरी देखील उपलब्‍ध आहेत.
 ऑडी एक्‍सक्‍लुसिव्‍हच्‍या माध्‍यमातून अतिरिक्‍त इंटीरिअर रंग व कस्‍टमायझेशन प्रदान करण्‍यात आले आहे.
 पुढील आसनावरील प्रवाशांसाठी उच्‍च-स्‍तरीय आरामदायीपणासह सीट वेन्टिलेशन व मसाज वैशिष्‍ट्य, पॉवर अॅडजस्‍टेबिलिटीसह मेमरी फंक्‍शन, ४-वे लंबर सपोर्ट व हिटर.
 पॅनोरॅमिक रूफ कारच्‍या आतील बाजूस पुरेसा प्रकाश येण्‍याची खात्री देते, ज्‍यामुळे एैसपैस जागा व हवेशीर केबिनची खात्री मिळते.

 पूर्णत: डिजिटल, ऑडी व्‍हर्च्‍युअल कॉकपीट प्‍लस एमएमआयमधून सानुकूल केलेल्‍या तीन विभिन्‍न व्‍ह्यूजच्‍या माध्‍यमातून ड्रायव्‍हरशी संबंधित सर्व माहिती दाखवते.
 एमएमआय नेव्हिगेशन प्‍लससह एमएमआय टच रिस्‍पॉन्‍स, तसेच सर्व वेईकल व इन्‍फोटेन्‍मेंट गरजांसाठी हॅप्टिक फिडबॅक.
 बीअॅण्‍डओ प्रिमिअम ३डी साऊंड सिस्‍टमसह १६ स्पीकर्स, तसेच ३डी साऊंड स्‍पीकर्स व सबवूफर, एकूण ७०५ वॅटचे आऊटपुट असलेले १५-चॅनेल अॅम्प्लिफायर.
 अॅम्बियण्‍ट लायटिंग पॅकेज प्‍लस ३० रंगांच्‍या पर्यायासह मूड सेट करण्‍याची सुविधा देते.
 ऑडी फोन बॉक्‍ससह वायरलेस चार्जिंग मोबाइल डिवाईसला सहजपणे चार्जिंग करते.

सुरक्षितता:
 लेन डिपार्चर वॉर्निंग योग्‍य स्टिअरिंगची सुविधा देत रस्‍त्‍यावरील लेन मार्किंग्‍जना क्रॉस करण्‍याला प्रतिबंध करण्‍यास मदत करते.
 प्रवाशांच्‍या सुरक्षिततेसाठी ८ एअरबॅग्‍जची अधिकतम सुरक्षितता.
 ऑडी प्री-सेन्‍स बेसिक आपत्‍कालीन ब्रेकिंगच्‍या वेळी किंवा मर्यादेनुसार ड्रायव्हिंग करण्‍याकरिता प्रतिबंधात्‍मक संरक्षण देते.
 टायरमधील हवेचा दाब कमी झाल्‍याची त्‍वरित माहिती मिळण्‍यासाठी डायरेक्‍ट टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्‍टम.
 रस्‍त्‍यावर सर्वोत्तम सुरक्षिततेसाठी अॅण्‍टी-थेफ्ट व्‍हील्‍स बोल्‍ट्स व लूझ व्‍हील वॉर्निंग.
 रिअर बेंच सीटसाठी आयएसओफिक्‍स चाइल्‍ड सीट अँर्क्‍स व टॉप टेथर.

डिजिटलायझेशन:
 ई-ट्रॉन हब ‘मायऑडी कनेक्‍ट’ अॅपवर उपलब्‍ध स्‍पेशल टॅब आहे, जे इलेक्ट्रिक वेईकल्‍सबाबत अनेक फंक्‍शन्‍स व वैशिष्‍ट्यांबाबत मार्गदर्शन करते.
 ‘चार्ज माय ऑडी’ वैशिष्‍ट्य ‘मायऑडी कनेक्‍ट’ अॅपवर उपलब्‍ध आहे. हे एक-थांबा सोल्‍यूशन आहे, जे ऑडी ई-ट्रॉन ग्राहकांना एकाच अॅपवर विविध चार्जिंग सहयोगींची माहिती देते. ऑडी ई-ट्रॉन ग्राहकांसाठी ‘चार्ज माय ऑडी’वर सध्‍या १,००० हून अधिक चार्ज पॉइण्‍ट्स उपलब्‍ध आहेत आणि पुढील काही महिन्‍यांमध्‍ये अधिक चार्ज पॉइण्‍ट्सची भर करण्‍यात येणार आहे.

 ग्राहकांसाठी ‘मायऑडी कनेक्‍ट’ अॅपचे नवीन, अॅप्‍पल वॉच व्‍हर्जन – हे वैशिष्‍ट्य ‘मायऑडी कनेक्‍ट’ अकाऊंट सेटअप केल्‍यानंतर आयफोनसाठी स्‍वतंत्रपणे कार्य करेल (अॅप्‍पल वॉच सेल्‍यूलरसह सक्रिय डेटा कनेक्‍शन आवश्‍यक आहे). हे वैशिष्‍ट्य ग्राहकांना दुरूनच त्‍यांच्‍या ऑडीचे शेवटचे रेकॉर्ड करण्‍यात आलेले लोकेशन पाहण्‍याची आणि अॅप्‍पल वॉचचा वापर करत लोकेशन नेव्हिगेट करण्‍याची सुविधा देईल. तसेच हे वैशिष्‍ट्य नुकतेच वेईकल स्‍टॅटिस्टिक्‍ससह ड्रायव्हिंग रेंज, बॅटरी लेव्‍हल व चार्जची स्थिती यांबाबत माहिती देखील दाखवेल. हे वैशिष्‍ट्य लवकरच ऑडी क्‍यू८ ई-ट्रॉन ग्राहकांसाठी सादर करण्‍यात येणार आहे.

मालकी हक्‍क अनुभव:
 कॉम्‍प्‍लीमेण्‍टरी १०-वर्ष रोड साइड असिस्‍टण्‍स (बेस्‍ट-इन-सेगमेंट).
 ८ वर्ष किंवा १६०,००० किमीची हाय व्‍होल्‍टेज बॅटरी वॉरंटी, जे पहिले येईल ते लागू.
 मर्यादित कालावधीसाठी कॉम्‍प्‍लीमेण्‍टरी २+३ वर्षांची वारंटी; जवळपास ७ वर्षांपर्यंत विस्‍त‍ारित करता येऊ शकते.
 पीरियोडिक मेन्‍टेनन्‍स / सर्वसमावेशक मेन्‍टेनन्‍स पॅकेजेस जवळपास ७ वर्षांपर्यंत उपलब्‍ध.
 ८ हाय व्‍होल्‍टेज बॅटरी रिपेअर सेंटर्स. फर्स्‍ट-इन-द-इंडस्‍ट्री, जे बॅटरी दुरूस्‍तीसाठी (असल्‍यास) लागणारा टर्न अराऊंड वेळ कमी करते.
 ‘मायऑडी कनेक्‍ट अॅप’वर नवीन ऑनलाइन बुकिंग वैशिष्‍ट्य ग्राहकांना ऑडी क्‍यू८ ई-ट्रॉनवर उपलब्‍ध असलेल्‍या वैशिष्‍ट्यांमधून निवड करण्‍यामध्‍ये मदत करते, तसेच ग्राहकांना ऑडी क्‍यू८ ई-ट्रॉन ऑनलाइन बुक करण्‍यासह ऑनलाइन पेमेंटचे विविध मोड्स देते.

Automobile Audi India Launch Audi Q8 etron Sportsback
Electric EV Vehicle Car Model

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

महिंद्राने परत मागविल्या तब्बल १ लाख गाड्या… तुमच्याकडेही आहे का…

Next Post

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत मोनो आणि मेट्रो रेल्वे चक्क तोट्यात… बघा, ही धक्कादायक आकडेवारी…

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

kapus
संमिश्र वार्ता

केंद्र सरकारने कापसावरील आयात शुल्क माफीला दिली या तारखेपर्यंत मुदतवाढ

ऑगस्ट 28, 2025
kanda onion
स्थानिक बातम्या

शेतकऱ्यांच्या कांद्याचे भाव पाडणे हे केंद्र सरकारचे नियोजनबद्ध षडयंत्र…कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा आरोप

ऑगस्ट 28, 2025
Untitled 1
संमिश्र वार्ता

मुंबईत अभिनेता सलमान खान यांच्या घरचा गणेशोत्सव…बघा, व्हिडिओ

ऑगस्ट 28, 2025
manoj jarange 1
महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगे पाटील मुंबईला येणार की परत माघारी जाणार? सरकारचे प्रयत्न सुरु

ऑगस्ट 28, 2025
GzWb8 LbwAAmwZi e1756344943344
महत्त्वाच्या बातम्या

बघा, शिवतीर्थावरील हा व्हिडिओ….राज ठाकरे उध्दव ठाकरे यांच्या सहकुटुंब भेटीचे चित्रीकरण

ऑगस्ट 28, 2025
modi 111
मुख्य बातमी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवत्सरीनिमित्त दिल्या शुभेच्छा…क्षमा, करुणा आणि नम्रतेचे केले आवाहन

ऑगस्ट 28, 2025
प्रातिनिधिक फोटो
राष्ट्रीय

या चार नवीन रेल्वे मार्गाला केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली मान्यता…१२ हजार ३२८ कोटींचा अंदाजित खर्च

ऑगस्ट 28, 2025
Screenshot 20250828 063447 Collage Maker GridArt
महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रातील या चार शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर…शिक्षक दिनानिमित्त दिल्लीत समारंभ

ऑगस्ट 28, 2025
Next Post
MUMBAI METRO 750x375 1

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत मोनो आणि मेट्रो रेल्वे चक्क तोट्यात... बघा, ही धक्कादायक आकडेवारी...

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011