विद्यापीठाच्या आवारात आरोग्य शास्त्रांची महाविद्यालये सुरु करावेत – राज्यपाल कोश्यारी
नाशिक- आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आवारात आरोग्य शाखांची महाविद्यालये सुरु करावेत असे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी विद्यापीठ नुतनीकरण इमारत व सौरउर्जा प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी केले.महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमाचे सन्मानीय अतिथी...