मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ऑस्ट्रेलियामधील युनिव्हर्सिटी ऑफ कॅनबेराने (यूसी) वाईस-चॅन्सलर्स सोशल चॅम्पियन स्कॉलरशिपची घोषणा केली आहे, जी समुदायामध्ये सकारात्मक योगदान देण्याची इच्छा असलेल्या आर्थिकदृष्ट्या वंचित ऑफशोअर विद्यार्थ्यांना ऑस्ट्रेलियामधील त्यांच्या पुढील शिक्षणामध्ये मदत करेल. स्कॉलरशिपचे एकूण संयोजित मूल्य जवळपास प्रति विद्यार्थी २००,००० डॉलर्स (अंदाजे जवळपास एक कोटी रूपये) आहे. यामध्ये कोर्स कालावधीसाठी शैक्षणिक शुल्क, कॅम्पस निवास खर्च आणि १०,००० डॉलर्सचा (ऑस्ट्रेलियन डॉलर्स) वार्षिक भत्ता समाविष्ट आहे.
वाईस-चॅन्सलर्स सोशल चॅम्पियन स्कॉलरशिप्स उत्तम शैक्षणिक कामगिरी करण्यासोबत सामाजिक समानतेप्रती नेतृत्व गुण व आवड देखील दाखवणा-या विद्यार्थ्यांना देण्यात येतील. या स्कॉलरशिपचा पदवीपूर्व किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करण्याची आणि समुदायामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याची इच्छा असलेल्या आर्थिकदृष्ट्या वंचित विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याचा मनसुबा आहे. या स्कॉलरशिप्समधून यूसीचा विविधता, सर्वसमावेशकता आणि दर्जेदार शिक्षण सर्वांना अधिक प्रमाणात उपलब्ध करून देण्यावरील भर दिसून येतो. असमानता कमी करण्यासाठी यूसीचा २०२१ टाइम्स हायर एज्युकेशन (टीएचई) इम्पॅक्ट रँकिंग्जमध्ये जगात पहिला क्रमांक होता.
युनिव्हर्सिटी ऑफ कॅनबेरा येथील कुलगुरू व अध्यक्ष प्रोफेसर पॅडी निक्सॉन म्हणाले, “आमची स्कॉलरशिप यूसीची मुलभूत मूल्ये आणि सामाजिक सहभाग, स्थिरता व असमानता कमी करण्याप्रती कटिबद्धता दाखवणा-या जगभरातील विद्यार्थ्यांसाठी डिझाइन करण्यात आली आहे. आम्हाला आंतरराष्ट्रीय स्तरावर शिक्षण घेण्यासाठी आर्थिक पाठिंबा नसलेल्या विद्यार्थ्यांना ही संधी देण्याचा आनंद होत आहे. आमच्यासाठी हा उत्साहवर्धक क्षण आहे आणि आम्ही भारतभरातील विद्यार्थ्यांचे सहभाग घेण्यास स्वागत करण्यासाठी आणि त्यांचे अर्ज प्राप्त करण्यासाठी उत्सुक आहोत.”
या स्कॉलरशिप्स यूसी येथील सेमीस्टर वन, २०२३ मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणा-या जगभरातील विद्यार्थ्यांना ऑफर करण्यात येतील. अर्जप्रक्रियेला १ एप्रिल २०२२ पासून सुरूवात होत आहे आणि ९ ऑक्टोबर २०२२ रोजी समाप्त होईल. अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ कॅनबेराची अधिकृत वेबसाइट www.canberra.edu.au/social-champion वर उपलब्ध असलेला व्हीसीचा सोशल चॅम्पियन स्कॉलरशिप ऑनलाइन अॅप्लीकेशन फॉर्म भरणे आवश्यक आहे.