इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – गर्लफ्रेंडने चांगलेच चोपल्याचा व्हीडिओ समोर आल्याने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क चांगलाच चर्चेत आला. त्याची प्रतिमा डागाळली गेली. या प्रकारानंतर तो ब्राण्ड अम्बेसिडर असलेल्या कंपनीनेही त्याच्यापासून दूरावा ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी त्याचे कोट्यवधीचे नुकसानही झाले आहे.
नशिब पालटले की सारेकाही पालटते, अशी म्हण प्रचलीत आहे. ऑस्टोलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क यांच्याबाबतही असेच काहीसे घडले. एका पाठोपाठ त्याच्या अडचणी वाढत गेल्या. क्लर्कचा एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यात गर्लफ्रेंड जेड यारब्रो त्याला बेदम मारहाण करताना दिसते आहे. यारब्रोने त्याच्यावर फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शूज आणि चप्पल बनवणाऱ्या आघाडीच्या ऑस्ट्रेलियन कंपनीने क्लार्कसोबत काम करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. क्लार्कसोबतचे नाते गेल्या वर्षी सुरू झाले आणि गेल्या वर्षीच संपले आणि आता या वादानंतर हे नाते पुन्हा सुरू करण्याचा त्यांचा कोणताही विचार नसल्याचे कंपनीने म्हटले आहे. यामुळे कंपनीसोबतच्या करारापोटी मिळणाऱ्या कोट्यवधीच्या रकमेवर क्लर्कला पाणी सोडावे लागणार आहे.
गर्लफ्रेंडचा कोप कशापायी?
मायकल क्लार्क आणि त्याची गर्लफ्रेंड जेड यारब्रो यांच्यात जे घडले तो नेमका प्रकार काय घडला हे सविस्तर समजू शकले नव्हते. पण, अलिकडेच मारहाणीदरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामध्ये जेड यारब्रो क्लार्कला बेदम मारहाण करताना दिसते आहे. यारब्रोने त्याच्यावर फसवणूक केल्याचा आरोप केल्याचेही दिसते. हा व्हिडिओ व्हायरल झाला, त्यानंतर चप्पल निर्मिती करणाऱ्या कंपनीनेही त्याला चांगलाच धक्का दिला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर क्लार्कसोबत काम करण्याचे कोणतेही कारण शिल्लक नसल्याचे ऑस्ट्रेलियन ब्रॅण्डने स्पष्टच सांगून टाकले.
Australia Michael Clarke Company Action Video Viral