कॅनबेरा (ऑस्ट्रेलिया) – आतापर्यंत आपण एकाच चक्रीवादळाच्या संकटाविषयी ऐकले किंवा पाहिले आहे. मात्र, ऑस्ट्रेलियात एकाचवेळी तब्बल दोन चक्रीवादळे धडकणार आहेत. तसा इशारा हवामान विभागांनी दिला आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शास्त्रज्ञही हैराण झाले आहेत.
पश्चिम ऑस्ट्रेलियामध्ये राहणाऱ्या नागरिकांना चक्रीवादळामुळे सुरक्षित ठिकाणी जाण्याचा इशारा देण्यात आला. कारण ऑस्ट्रेलियात एकाच वेळी दोन वादळ धडकणार असून या प्रकारामुळे शास्त्रज्ञही हैराण आहेत. हवामानशास्त्रज्ञांच्या मते, दोन धोकादायक वादळ सेरोजा आणि ओडेट ही ऑस्ट्रेलियाच्या अगदी जवळ आहेत. ही गोष्ट खूप दुर्मिळ आहे. जगात एखाद्याच ठिकाणी दोन वादळ एकाच वेळी उद्भवू शकतात. या वादळांमुळे या आठवड्याच्या शेवटी पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या काही भागात हवामानाची तीव्र प्रतिकुल परिस्थिती उद्भवू शकते.
सदर चक्रीवादळ ओडेट उष्णकटिबंधीय कमी दाबाने सुरू झाले, परंतु पहाटे ते चक्रीवादळाच्या रूपात बदलले. ऑस्ट्रेलियन प्रदेशातील हे या हंगामातील सातवे चक्रीवादळ आहे. सेरोजा चक्रीवादळामुळे ९३ मैल वेगाने वारा वाहण्याची शक्यता आहे.
इतकेच नाही तर चक्रीवादळ सेरोजामुळे मुसळधार पाऊस आणि पूर याविषयी अलर्टही जारी करण्यात आला आहे. तसेच रात्रीपर्यंत चक्रीवादळ ओडेट ऑस्ट्रेलियावर आदळेल, असा अंदाज हवामानशास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे, त्यामुळे जोरदार वारे आणि मुसळधार पावसामुळे पूर येण्याचा धोका आहे.
चक्रीवादळ सेरोजामुळे झालेल्या विध्वंसमुळे दक्षिण ऑस्ट्रेलियामध्ये प्रचंड कहर होऊ शकतो. उष्णकटिबंधीय वादळ सरोजाने यापूर्वीच इंडोनेशियातील काही भागात प्रचंड कहर केला आहे. इंडोनेशियातील पूर्व नुसा तेंगगारा प्रांतात चक्रीवादळ सेरोजा चक्रीवादळामुळे मृतांची संख्या १६७ झाली आहे. इतकेच नाही तर ४५ जण अद्याप बेपत्ता आहेत.
बघा संभाव्य चक्रीवादळाचे ग्राफिक्स
https://twitter.com/UWCIMSS/status/1380293343104630786