गुरूवार, नोव्हेंबर 6, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

कितीही संकटे आली तरी खचू नका… ही बघा, औरंगाबादच्या महिला शेतकऱ्यांची यशोगाथा… ३१० महिलांची यशोवाटचाल..

एप्रिल 15, 2023 | 5:09 am
in राष्ट्रीय
0
aurangabad2

 

अजिंठा महिला उत्पादन कंपनीच्या माध्यमातून
३१० शेतकरी महिलांची वाटचाल

– डॉ. मीरा ढास, छत्रपती संभाजीनगर
ग्रामीण पातळीवर आता शिक्षणाचा प्रसार झाल्यामुळे विविध व्यवसाय पुढे येत आहेत,औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री सारख्या तालुक्यातून मोठ्या प्रमाणात महिलांनी एकत्र येऊन प्रक्रिया उद्योगांमध्ये एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. याची नोंद केंद्र शासनाच्या एपीओ तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये घेतली गेली आहे. सर्व महिला एकत्र येऊन आर्थिक उन्नती कडे वाटचाल करीत आहेत.

पद्मा चव्हाण आणि वंदना जाधव यांनी एकत्र मिळून या 310 सभासद महिलांना एकत्र आणले, त्यांना मार्गदर्शन, आणि योग्य वेळी जे काही मदत लागते ते केले जात आहे .सध्या या कंपनीमध्ये फुलंब्री तालुक्यातील 14 गावातील महिला सहभागी आहेत ,यामध्ये वारेगाव, किनगाव ,शिरोडी, डोंगरगाव, गणोरी ,बोधेगाव, नरला, निधोना, मुर्शिदाबादवाडी, चौका, बाभूळगाव तरटे, वाघोळा, सांजोळ, वाणेगाव असे इतर गावातली महिलाही या कंपनीमध्ये सभासद म्हणून सामील झालेले आहेत.

या महिलांनी शेतकऱ्यांचा उत्पादित झालेला गहू खरेदी केलेला आहे आणि हा गहू खरेदी करून त्याची ग्रेडिंग आणि वेगवेगळ्या दर्जाप्रमाणे त्याची विक्री विविध कंपन्यांना केली जात आहे. कंपनीच्या अध्यक्ष पद्मा चव्हाण यांनी सांगितले की ” आतापर्यंत आम्ही ३१० महिलांना यामध्ये सहभागी करून घेतले आहे ,पण आता इथून पुढे हजार, पुढे दहा हजारपर्यंत सदस्य करण्याचे उद्दिष्ट आहे. यामध्ये महिलांना सहभागी करून त्यांना रोजगार आणि आर्थिक स्वावलंबीपणे बनवण्याचं काम आम्ही करणार आहोत”.

या कंपनीच्या सचिव वंदना जाधव यांनी सांगितले की “महिलांच्या हितासाठी ही कंपनी काम करत असून शासनाच्या सर्व योजनांचा एकत्रित लाभ घेऊन आम्ही सर्वसामान्य शेतकरी महिलाचे जीवन उंचावणार आहोत ,यासाठी गावातील लागवड ते विक्री व्यवस्थापनाचे पूर्ण नियोजन आम्ही करतो. कंपनीमार्फत शेतकऱ्यांना बी- बियाणे उपलब्ध करून देऊन त्यांना योग्य भावात सर्व खते बी बियाणे उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांच्या शेतमालाला चांगल्या प्रकारचा भाव व बाजारपेठ उपलब्ध करून देऊन आर्थिक प्रगतीसाठी मदत करणार आहोत .यामध्ये शेतकरी ते विक्रेता यामधील मधस्थाची जी भूमिका आहे ही कमी होऊन शेतकऱ्यांना योग्य भाव या कंपनीच्या माध्यमातून दिला जाणार आहे.

“शेतकरी नैसर्गिक संकटाचा सामना करून आपल्या मेहनतीतून पीक पिकवतो आणि याचा योग्य मोबदला त्याला मिळत नाही पण आधारभूत किमतीच्या भाव पडले तर त्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही यामुळे या कंपनीचा फायदा शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी शेतकऱ्यांना होणार आहे.”

या कंपनीमध्ये सहभागी होण्यासाठी प्रथम महिला च्या नावाने शेती सातबारा असणे आवश्यक असून 110 रुपयाच्या बॉण्ड पेपरसह त्यांना सभासदत्व दिले जात आहे. मराठवाड्यामध्ये महिला शेतकऱ्यांसाठी सहभागी असलेली ही सर्वात मोठी कंपनी असून आज ती यशस्वीकडे वाटचाल करत आहे.

शेतकरी महिलांना उद्योजक म्हणून जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात अजंठा खोरे वुमेन फार्मर्स प्रोडूसर कंपनी स्थापन करण्यात आलेली आहे. या कंपनीमध्ये आज घडीला 310 महिला सभासद असून, एकूण पाच जणांचे महिला संचालक मंडळ आहे .तसेच पाच कंपनीचे प्रवर्तक आहेत ,ही सर्व टीम मिळून महिला शेतकरी भगिनीना एकत्र घेऊन वाटचाल करते आहे. कंपनी शेतकऱ्याचा उत्पादित केलेला शेतमाल खरेदी करून त्याला योग्य बाजार भाव मिळावा यासाठी काम करते, तसेच शेतकऱ्यांना अल्प दरामध्ये खत ,बी -बियाणे आणि शेती विषयक मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे .या कंपनी मार्फत बी बियाणे आणि खत औषधेचे खरेदी विक्री परवाना तोही त्यांनी मिळवलेला , उद्योगाचे नोंदणी आधार प्रमाणपत्र, FSSAI एफएसएसएआय प्रमाणपत्र ,जीएसटी प्रमाणपत्र या सर्व गोष्टीची नोंदणी करून कंपनीची स्थापना गेल्या वर्षी केली.

अजंता खोरे वूमन फार्मर्स प्रोडूसर कंपनी ही केंद्र शासनाच्या दहा हजार (FPO)शेतकरी उत्पादक कंपनी तयार करण्याच्या योजनेमध्ये सामील केले आहे. या अंतर्गत कंपनीला केंद्र शासनाकडून केंद्र ज्या काही शेतीविषयक योजनेचा शेतकऱ्यांना लाभ देणाऱ्या योजना आहेत त्याचा लाभ मिळणार आहे या योजनेविषयी, कृषी विभाग आत्मा ,व (आयटीसी) इंडियन टोबॅको कंपनी यांनी या महिला सभासदांना सहकार्य केलेला आहे.

कंपनी आपला गहू ,मका ,फळे व भाजीपाला तसेच इतर शेतमाल याची खरेदी- विक्रीसाठी मदत करणारअसून आयटीसी कंपनीवर करार केल्यामुळे सभासदांना वाजवी दरामध्ये बी- बियाणाने, खते उपलब्ध करून त्याच्या मालाचे मूल्यवर्धन केले जाणार आहे. शेतमाल विक्रीसाठी बचतगट ,उमेद, कृषी विभाग या सर्व विभागाच्या मार्गदर्शनातून या महिला एकत्र जोडल्या गेल्या असून मोठ्या प्रमाणामध्ये शेती आधारित उद्योग आणि शेतीचा माल खरेदी करून एक व्यावसायिक आणि किफायतशीर शेती एक उद्योग म्हणून याचा अवलंब करत आहेत. कंपनीमार्फत सभासदांना वेगवेगळ्या ठिकाणी प्रगती प्रगतिशील शेतकरी असणाऱ्या गावात, शासनाच्या विविध महत्त्वपूर्ण आणि पथदर्शी प्रकल्पाला भेट देत असून नवीन नवीन तंत्रज्ञान अवगत करून शेतकरी महिला आपले स्वतःचे जीवनमान उंचावून आर्थिक फायदाही मिळून घेत आहेत.

कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी विभाग आणि आत्मा या सहकार्याने सभासदांना ज्या पिकाविषयी व शेतीविषयक सर्व मार्गदर्शन दिले आहे.फुलंब्री येथे त्यांना वेगवेगळ्या विषयतज्ञ आणि तज्ञ व्यक्तींना बोलून मार्गदर्शन केले जात आहे. शेतकरी सभासद महिलांना वेगवेगळ्या पिकाविषयी आणि त्याच्या वाणाविषयी माहिती देऊन उत्पादनात कशी वाढ करता येईल याबाबत मार्गदर्शन केले जाते तसेच सेंद्रिय शेती आणि निसर्ग शेतीच्या माध्यमातून कमी खर्चामध्ये किफायतशीर शेतीचा अवलंब या महिला करत आहेत. यामुळे निश्चितच त्यांच्या उत्पादनात आणि आर्थिक फायद्यामध्ये वाढ होत आहे. या कंपनीच्या मार्फत जे काही शेतीविषयक मार्गदर्शन, सल्ला हवामानाचा अंदाज , पीक पद्धती त्याचप्रमाणे खत, बी -बियाण्याचा योग्य वापर करण्यासंदर्भात मार्गदर्शन आणि बाजार भावाची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी मार्स हे मोबाइल ॲप हे सभासदांना डाऊनलोड करून दिलेले आहे.

या ॲपच्या माध्यमातून कंपनीच्या सदस्यांना महिला शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज बाजार भाव विक्री खरेदी आणि बाजार शेतमालाची सद्यस्थिती याविषयी माहिती कळते . भविष्यामध्ये महिलांना दैनंदिन असणाऱ्या अडचणी असतील यात आरोग्याचा तक्रारी किंवा आर्थिक अडचण असेल यावेळेस आरोग्यावर आरोग्य तपासणी करून त्यांना उपचार आणि मार्गदर्शन आणि आर्थिक मदत केली जाणार आहे. या सर्व बाबीतून महिलांचे सक्षमीकरण शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून होत आहे . शासनाचे धोरण धोरण आहे की विषमुक्त शेती आणि आरोग्यदायी जीवन यासाठी सेंद्रिय पद्धतीने शेती उत्पादन किंवा शेतमाल उत्पादन केला जात आहे या गोष्टीला चालना आणि प्रचार प्रसार करण्याचं काम या कंपनीच्या माध्यमातून या महिला सभासद करत आहेत. या तालुका पातळीवर एकसंघ भावनेने काम केल्यामुळे महिला शेतकरी भगिनीमध्ये आत्मविश्वासा सोबत आत्मनिर्भरतेकडे वाटचाल झालेली दिसून येत आहे.

Aurangabad Women Farmer Group Success Story

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

हे आहेत भारतातील सर्वात श्रीमंत सीईओ… त्यांचा पगार जाणून तु्म्ही थक्कच व्हाल!

Next Post

व्याघ्र प्रकल्पाच्या धर्तीवर राज्यात होणार हा प्रकल्प; वनमंत्र्यांची घोषणा

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

bath tub
महत्त्वाच्या बातम्या

अतिशय दुर्दैवी… गरम पाण्याच्या टबमध्ये पडून बालिकेचा मृत्यू…

नोव्हेंबर 6, 2025
575211735 10239725133169293 595243740486033833 n
महत्त्वाच्या बातम्या

टाटा मोटर्सची विश्वविजेत्या महिला संघाला मोठी भेट

नोव्हेंबर 6, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

पाऊस पुन्हा येणार का? थंडी कधीपासून लागणार?

नोव्हेंबर 6, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, ७ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 6, 2025
rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
post
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट पार्सल सुविधेबाबत मोठा निर्णय… मिळणार हा फायदा…

ऑक्टोबर 29, 2025
IMG 20251029 WA0033
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रंगणार एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार…

ऑक्टोबर 29, 2025
salher
मुख्य बातमी

साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…

ऑक्टोबर 29, 2025
Next Post
मा. मंत्री सुधीर मुनगंटीवार 2 1140x570 1

व्याघ्र प्रकल्पाच्या धर्तीवर राज्यात होणार हा प्रकल्प; वनमंत्र्यांची घोषणा

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011