औरंगाबाद – कोरोना संसर्गासंदर्भात राज्य सरकारने विविध नियम घालून दिलेले असतानाही येथे विनापरवानगी भव्य आक्रोश मोर्चा काढणाऱ्या शिवसेनेच्या आयोजकांवर गुन्हे दाखल होण्याची चिन्हे आहेत. तसे सूतोवाच पोलिस आयुक्त निखील गुप्ता यांनी सांगितले आहे. त्यामुळे महागाईच्या विरोधात काढण्यात आलेला हा मोर्चा आयोजकांनाच महागात पडणार असल्याचे दिसून येत आहे.
इंधनासह विविध जीवनावश्यक वस्तू आणि पदार्थांच्या किंमती महागल्याने त्याविरोधात शिवसेनेने खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली भव्य आक्रोश मोर्चा काढला. याप्रसंगी माजी खासदार चंद्रकांत खैरे, मंत्री संदिपान भुमरे, अब्दुल सत्तार यांच्यासह शिवसेनेचे अनेक नेते व पदाधिकारी उपस्थित होते. शिवसैनिक या मोर्चाला मोठ्या संख्येने सहभागी झाले. कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही दूर न झाल्याने राज्य सरकारने कोरोना निर्बंधांना पूर्णपणे शिथीलता दिलेली नाही. अशातच विनापरवानगी भव्य आक्रोश मोर्चा शिवसेनेने काढला आहे. त्यामुळे या मोर्चाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करणार असल्याचे आयुक्त गुप्ता यांनी सांगितले आहे.
संजय राऊत केंद्रावर बरसले
देशातील महाराई वाढण्यास केंद्र सरकार जबाबदार आहे. मोदी सरकारला सर्वसामान्यांशी काहीही घेणे नाही. महागाई वाढत असली तरी त्याची कुठलीही दखल घेतली जात नाही. केंद्राच्या चुकीच्या धोरणांमुळेच देशभरात १७ हजाराहून अधिक व्यापाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. मोदी सरकारचा कारभार ही निजामशाहीच आहे, अशी टीका खासदार राऊत यांनी यावेळी केली.
बघा मोर्चाचा व्हिडिओ
https://twitter.com/azars_007/status/1459420151971868674