औरंगाबाद (इंडिया दर्पण वृत्तसेवा ) – शिक्षकांच्या सर्व संघटनांनी ऐक्याची वज्रमूठ घट्ट करून आज शिक्षक भारती संघटनेने आयोजित केलेल्या आत्मसन्मान मोर्चात सहभाग नोंदवत विभागीय आयुक्त कार्यालयावर धडक दिली. तब्बल १० हजार शिक्षक भर पावसात चिंब भिजत मोर्चात सहभागी झाले. यात महिला भगिनींनी लक्षणीय सहभाग नोंदवला. मोर्चामुळे आमखास मैदान ते दिल्ली गेट रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. मोर्चाचे नेतृत्व आमदार कपिल पाटील,आमदार विक्रम काळे, आ.सतीश चव्हाण, आ.सुधीर तांबे, नवनाथ गेंड यांनी केले. विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी उपस्थित शिक्षकांशी भ्रमण ध्वनीवरून संवाद साधला. यावेळी बोलताना आमदार महोदयांनी यापुढील लढाई आम्ही योग्य ठिकाणी लढून शिक्षकांना लवकरच चिंतामुक्त करू असे सांगितले. आमदार कपिल पाटील, आ.विक्रम काळे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या भाषणाला कडाडून टाळ्या मिळाल्या. आमदारांच्या शिष्टमंडळाने आयुक्तांचे प्रतिनिधी तहसीलदार अरुण पावटे यांना निवेदन दिले.सूत्र संचालन संतोष ताठे यांनी प्रकाश दाणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
आजच्या मोर्चासाठी सहभागी शिक्षक संघटनांचे नवनाथ गेंड,सुभाष महेर,किशोर कदम,दिनेश खोसे,भरत शेलार,विनोद कडवं,स्वाती बेंडबर,शगुफ्ता फारुकी, राजेश भुसारी, सुनील चिपाटे,महेंद्र बारवाल, विठ्ठल बदर,अनिल देशमुख, श्याम राजपूत,सुनील जाधव,भगवान हिवाळे, संजय बुचुडे, गोविंद उगले,इलाजुद्दीन फारुकी, मोईन शेख,मच्छिंद्र भराडे,गणेश पिंपळे,बिजू मारग,राजेश हिवाळे, दीपक पवार, आर.आर.पाटील, संपत साबळे,संजीव बोचरे, मनोज खुटे,अनिल दाणे, अब्दुल रहीम, भीमराव मुंढे,विनोद पवार, प्रशांत नरवाडे,साहेबराव धनराज, अय्युब पटेल,सुनील काळे, विजय ढाकरे,नितीन पवार,धनंजय परदेशी,सुषमा खरे, रोहिणी विद्यासागर, उर्मिला राजपूत,स्वाती गवई,पुष्पा जाधव,सुप्रिया सोसे,शिल्पा निकम, आदींनी परिश्रम घेतले.