मुकुंद बाविस्कर, इंडिया दर्पण वृतसेवा
औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्यावरून सध्या राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. एका बाजूला भाजप तर दुसरीकडे शिवसेना उभी दिसत आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादच्या नामांतराबद्दल शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाब विचारला आबे. त्यामुळे उद्धव यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. याच निमित्ताने औरंगाबादच्या नामांतराचा इतिहासजाणून घेऊया…
1980 च्या दशकात महाराष्ट्रात शिवसेना झपाट्याने राजकीय पक्ष म्हणून उदयास येत होती. त्यावेळी राज्यात हिंदुत्वाचा मोठा चेहरा म्हणून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची ओळख होत होती. त्यावेळी 1988 च्या औरंगाबाद महापालिका निवडणुकीत शिवसेनेला 27 जागा मिळाल्या होत्या, त्यानंतर संस्कृती मंडळ मैदानावर विजयी सभेला संबोधित करताना बाळासाहेब ठाकरे यांनी पहिल्यांदाच औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करण्याची मागणी केली होती, मात्र त्यांच्या हयातीतच शिवसेनेला 27 जागा मिळाल्या होत्या. बाळ ठाकरे औरंगाबादचे नाव बदलू शकले नाही.
एका विजयी रॅलीनंतर शिवसेनेचे कार्यकर्ते औरंगाबादला संभाजीनगर म्हणू लागले आणि आजही शिवसेनेच्या मुखपत्र सामनामध्ये औरंगाबादला संभाजीनगर म्हटले जाते, त्यामुळेच वारंवार भाजपला प्रश्न विचारूनही शिवसेना या मुद्द्यावरून शांत दिसत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीमुळे. त्याचवेळी, यापूर्वी मशिदींतील लाऊडस्पीकरचा मुद्दा उपस्थित करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही रविवारी पुण्यात झालेल्या सभेत औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करण्याबाबत उल्लेख केला होता.
महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यात मुघल शासक औरंगजेबचा मृत्यू झाला, ज्याची कबर आजही औरंगाबाद नजिक खुल्ताबादमध्ये आहे आणि त्याच नावावरून शहराचे नाव औरंगाबाद ठेवण्यात आले. तर छत्रपती संभाजी महाराज हे मराठा शासक छत्रपती महाराजांचे ज्येष्ठ पुत्र होते. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 3 एप्रिल 1680 रोजी त्यांना मराठा साम्राज्याची सुत्रे देण्यात आली. संभाजी महाराज त्यांच्या पराक्रमासाठी प्रसिद्ध होते, त्यांनी मुघल शासक औरंगजेबाविरुद्ध युद्ध केले आणि विजापूर आणि गोलकोंडा सारखे महत्त्वाचे किल्ले मुक्त केले.