मुंबई – सणासुदीचे दिवस पुन्हा सुरू होत असल्याने ऑगस्ट महिन्यात बँका १५ दिवस बंद राहणार आहेत. तुमचे बँकांमध्ये काही कामे असतील, तर योग्य नियोजन करण्यासाठी सुट्टयांची यादी एकदा पाहून घ्या. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया प्रत्येक महिन्यात सुट्ट्यांची यादी जाहीर करते. बँकाना ऑगस्टमध्ये ८ दिवस सार्वजनिक सुट्टी तर, सात दिवस साप्ताहिक सुट्टी असेल. तर चला मग पाहूया, कोणत्या दिवशी बँक सुरू आणि बंद राहील ते.
सुट्ट्यांची यादी अशी
१ ऑगस्ट – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
८ ऑगस्ट – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
१३ ऑगस्ट – शुक्रवार- पॅट्रियॉट्स डे (इंफाळमध्ये सुट्टी)
१४ ऑगस्ट – दुसरा शनिवार सुट्टी
१५ ऑगस्ट – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
१६ ऑगस्ट – पारशी नवीन वर्ष – (मुंबई, नागपूर आणि बेलापूरमध्ये सुट्टी)
१९ ऑगस्ट – मोहरम (अगरतळा, अहमदाबाद, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनऊ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पाटणा, श्रीनगर, रायपूर येथे सुट्टी)
२० ऑगस्ट – मोहरम आणि ओणम (बंगळुरू, चेन्नई, कोच्ची आणि तिरुअनंतपुरममध्ये सुट्टी)
२१ ऑगस्ट – थिरुओणम (कोच्ची आणि तिरुअनंतपुरम येथे सुट्टी)
२२ ऑगस्ट – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
२३ ऑगस्ट – श्री नारायण गुरू जयंती (कोच्ची आणि तिरुअनंतपुरममध्ये सुट्टी)
२८ ऑगस्ट – महिन्याचा चौथा शनिवार सुट्टी
२९ ऑगस्ट – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
३० ऑगस्ट – जन्माष्टमी, कृष्ण जयंती (अहमदाबाद, चेन्नई, डेहराडून, गंगटोक, गुवाहाटी, जयपूर, रांची, शिलाँग, शिमलामध्ये सुट्टी)
३१ ऑगस्ट – श्री कृष्ण जयंती (हैदराबाद येथे बँक बंद)